नवी दिल्ली, 09 सप्टेंबर : देशातील कोरोनाबाधितांची (Coronavirus India) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या देशात 43 लाख 70 हजार 129 एकूण कोरोनाबाधित रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 89 हजार 706 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर देशात 74 हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या लशीकडे (Corona vaccine) सर्वांचे लक्ष लागले आहे. देशभरात वेगवेगळ्या लसींवर संशोधन सुरू आहे. नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी भारतात विकसित केल्या जात असलेल्या लशींमध्ये तीन लशी ट्रायलमध्ये आहे. तर वेगवेगळ्या टप्प्यात आहेत.
पॉल कोव्हिड-19 लशीच्या राष्ट्रीय तज्ज्ञ गटाचे प्रमुख देखील आहेत. ते म्हणाले की मानवी लस चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे आणि चाचणीच्या दुसर्या टप्प्यात प्रवेश केला आहे. तर, दुसर्या लशीच्या दुसर्या व तिसर्या टप्प्यातील मानवी चाचण्यांची प्रक्रियाही सुरू झाली आहे.
वाचा-मोठा झटका! ऑक्सफोर्ड लशीची चाचणी थांबली
भारताच्या लशीचे स्टेटस
1- ICMR-भारत बायोटेक लसीने पहिला टप्पा पूर्ण केला आणि फेज 2 साठी लोकांची नोंदणी सुरू झाली आहे. ही एक देशी लस आहे.
2- Zydus कॅडिला लशीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून अजून एक टप्पा सुरू आहे. ही देखील भारतीय लस आहे.
3- याव्यतिरिक्त, आणखी एक ट्रायस सीरम इंस्टिट्युटही करीत आहे. सीरम ऑक्सफोर्ड लसीवर काम करत आहे. अॅस्ट्रॅजेनेका ही याची बेस कंपनी आहे. सध्या या लसीचे ट्रायल थांबवण्यात आले आहे.
4- दुसरीकडे रशियाच्या Sputnik V लशीचे उत्पादन सुरू झाले आहे. रशियाच्या विनंतीनुसार भारत या लशीवर चर्चा करत आहे.
वाचा-चिंता वाढली! पुन्हा नवीन रुग्णांची संख्या 90 हजारांच्या घरात
रशियाच्या लसीवर काय आहे भारताचे मत?
रशियाच्या लसीवर डॉ. पॉल म्हणाले की, देशाच्या एका खास मित्रांकडून आलेल्या या ऑफरचा सरकार विचार करत आहे. ते म्हणाले की भारतीय वैज्ञानिकांनी Sputnik V शी संबंधित डेटा पाहिला आहे जो आता सर्वांसमोर आहे आणि त्यासाठी तिसर्या टप्प्यातील चाचणीची आवश्यकता असेल.
वाचा-COVID-19: कोरोनावरच्या या 5 लशींपासून जगाला आहे सर्वात जास्त आशा
ऑक्सफोर्ड लशीची चाचणी थांबली
अॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca) आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लशीच्या (Oxford covid-19 Vaccine) मानवी चाचणीत सामील झालेली व्यक्ती आजारी पडल्यानंतर ट्रायल थांबवण्यात आले आहे. अॅस्ट्रॅजेनेका यांनी एक निवेदन जारी केले आहे, यात त्यांनी रुटीन म्हणून ट्रायल थांबवले असल्याचे सांगितले. चाचणीत सामील झालेल्या व्यक्तीच्या आजाराबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccine