अखेर कोरोना लशीची तारीख ठरली! 'या' देशानं सुरू केली सार्वजनिक लसीकरणाची तयारी

अखेर कोरोना लशीची तारीख ठरली! 'या' देशानं सुरू केली सार्वजनिक लसीकरणाची तयारी

सध्या अमेरिका, रशिया, ब्रिटन, भारत यासंह अनेक देश कोरोनावर लस शोधण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत. एकीकडे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीने तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात केली आहे.

  • Share this:

मॉस्को, 02 ऑगस्ट : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. जगभरात आतापर्यंत 1, कोटी 77 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 6 लाख 82 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. असे असले तरी कोरोनावर लस अद्याप मिळालेली नाही आहे. सध्या अमेरिका, रशिया, ब्रिटन, भारत यासंह अनेक देश कोरोनावर लस शोधण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत. एकीकडे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीने तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात केली आहे. तर, रशियाने आता थेट सार्वजनिक लसीकरणाची तयारी सुरू केली आहे. कारण ऑगस्ट अखेरीस कोरोनाची लस देण्याचा विचार रशिया करत आहे.

रशिया देशातील आपल्या प्रायोगिक कोरोना लसीच्या 3 कोटी डोसची तयारी करत आहे. एवढेच नव्हे तर या लसीचे 17 कोटी डोस परदेशात बनविण्याचा मॉस्कोचा मानस आहे. रशिया डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे प्रमुख किरिल दिमित्रीव्ह यांनी म्हटले आहे की एका महिन्यासाठी 38 लोकांची पहिली चाचणीही या आठवड्यात पूर्ण झाली. ही लस वापरण्यास सुरक्षित आहे आणि रोग प्रतिकारशक्ती देखील विकसित करीत असल्याचे संशोधकांना आढळले आहे. ऑग्सटमध्ये रशियाला व सप्टेंबरमध्ये इतर देशांमध्ये या लसीच्या उत्पादनाचे काम सुरू होईल.

वाचा-कोणत्या घरांमध्ये कोरोना संक्रमणाचा सगळ्यात जास्त धोका? वैज्ञानिकांचा खुलासा

सप्टेंबरपासून सुरू होणार उत्पादन

रशियाची गमलेई लस पाश्चात्य देशांपेक्षा वेगाने वाढत आहे. या लसीची फेज 3चा ट्रायलही सुरू आहे. रशिया, सौदी अरेबिया आणि युएई मधील हजारो लोक यात सहभागी होत आहेत. असा विश्वास आहे की सप्टेंबरपर्यंत रशिया कोरोना व्हायरस लस तयार करेल. गॅमलेई सेंटरचे प्रमुख अलेक्झांडर गिंटझबर्ग यांनी सरकारी एजन्सी TASS सांगितले की, 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान ही लस 'सिव्हिल सर्कुलेशन' मध्ये असेल अशी त्यांची अपेक्षा आहे. अलेक्झांडर यांच्या म्हणण्यानुसार सप्टेंबरपासून खासगी कंपन्या लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू करतील.

वाचा-‘अमेरिकेत 5 महिन्यात येणार COVID-19वर लस’, तज्ज्ञांच्या दाव्याने आशा वाढली

Moderna Inc ची लस टेस्टमध्ये पास

यापूर्वी मॉडर्नना इंक या अमेरिकन कंपनीची कोरोना व्हायरस लसदेखील पहिल्या चाचणीत पूर्णपणे यशस्वी झाली होती. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार असे म्हटले आहे की 45 निरोगी लोकांवर या लसीची पहिली चाचणी घेण्यात खूप चांगले निकाल आले आहेत. या पहिल्या चाचणीत 45 लोकांचा समावेश होता जे निरोगी होते आणि त्यांचे वय 18 ते 55 दरम्यान आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 2, 2020, 10:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading