भारतात कोरोनाची लस कधी येणार आणि कोणाला पहिली मिळाणार? आज होणार खुलासा

भारतात कोरोनाची लस कधी येणार आणि कोणाला पहिली मिळाणार? आज होणार खुलासा

ICMR-भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या Covaxin या लशीची सध्या दुसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू आहे.

  • Share this:

मुंबई, 04 ऑक्टोबर : जगभरात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. याच दरम्यान कोरोनाची लस कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोरोनाच्या लशीत रशियानं पहिला क्रमांक लावला असला तरीही त्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफोर्डची लस, भारत बायोटेक आणि जॉन्सन अॅण्ड जॉनन्स या तीन कंपन्यांकडून जगाला खूप अपेक्षा आहेत. यालशीबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र भारतात लस कधी उपलब्ध होणार आणि सर्वात आधी कुणाला मिळणार यासंदर्भात अधिकृतपणे आज केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन माहिती देणार आहेत.

रविवारी दुपारी 1 वाजता केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती देणार आहेत. भारत रशियाच्या लशीच्या उत्पादनाबाबत उत्सुक आहे त्या कराराबाबत काय होणार? याशिवाय भारत बायोटेक आणि सीरम इंस्टिट्यूटने तयार केलेल्या लशीसंदर्भातही ते माहिती देणार आहेत. रविवारी दुपारी डॉ. हर्षवर्धन कोरोना लशीचं उत्पादन आणि ती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी काय योजना असेल यासंदर्भात बोलणार आहेत.

हे वाचा-ट्रम्प यांच्यासाठी 48 तास महत्त्वाचे, वाचा डॉक्टरांना कोणत्या गोष्टीची काळजी

ICMR-भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या Covaxin या लशीची सध्या दुसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू आहे. झायडस कॅडिलाचा ZyCov-D या लशीची सध्या मानवी चाचणी सुरू असून त्याचं परीक्षण नोंदवण्याचं काम सुरू आहे. ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि सीरमने तयार केलेली Covishield या लशीची सध्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. त्यामुळे या लशी प्रत्यक्षा येण्यासाठी आणखीन किती कालावधी लागेल आणि काय नियोजन असेल यासंदर्भात आज डॉक्टर हर्षवर्धन माहिती देणार आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 4, 2020, 9:21 AM IST

ताज्या बातम्या