मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Coronavirus Vaccination: 'आपले शेकडो साथीदार परत येणार नाहीत...', कोरोना योद्धांच्या आठवणीत मोदी भावुक

Coronavirus Vaccination: 'आपले शेकडो साथीदार परत येणार नाहीत...', कोरोना योद्धांच्या आठवणीत मोदी भावुक

भारतात कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये व्हॅक्सिनेशन (Coronavirus Vaccination Drive)  अभियानास सुरुवात झाली आहे. दरम्यान याबाबत घोषणा करताना कोरोना काळात जीव गमावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आठवणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) भावुक झाले होते.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 16 जानेवारी: भारतात कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये व्हॅक्सिनेशन (Coronavirus Vaccination Drive)  अभियानास सुरुवात झाली आहे. देशामध्ये लसीकरणास सुरुवात होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देशाला संबोधित केले.  ते म्हणाले की लसीकरणानंतरही कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. लसीकरणाच्या वेळी कोविड प्रोटोकॉलचे अनुसरण करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. ते म्हणाले, 'भारत चोवीस तास सतर्क होता. आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतले.' दरम्यान कोरोना लसीकरण अभियानाची घोषणा करताना कोरोना काळात जीव गमावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आठवणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) भावुक झाले होते. जे कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात अडकले होते, त्यांच्या आठवणीत मोदी भावुक झाले. अशा कोरोना योद्धांच्या आठवणीत पंतप्रधान असे म्हणााले की, 'आमचे शेकडो साथीदार घरी परतू शकले नाहीत.' (हे वाचा- या बँकांमधील बचत खात्यात मिळतंय सर्वाधिक व्याज, वाचा कुठे मिळेल जास्त फायदा) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पंतप्रधान असे म्हणाले की, 'आमचे डॉक्टर, पोलीस सहकारी, इतर आघाडीच्या कामगारांनी माणुसकीप्रति असलेल्या त्यांच्या कर्तव्याला प्राधान्य दिले.यातील अनेकजण त्यांच्या मुलांपासून आणि कुटूंबापासून दूर होते.बरेच जण कित्येक दिवस घरी गेले नव्हते.असे शेकडो आपले साथी आहेत जे कधीही घरी परत येऊ शकणार नाहीत.  या प्रत्येकाने एक जीव वाचवण्यासाठी स्वत:च्या प्राणांची आहुती दिली. (हे वाचा- Corona Vaccine : लसीकरणानंतर ‘या’ देशात 23 जणांचा मृत्यू, जगाला दिला इशारा!) पीएम मोदी म्हणाले, 'म्हणूनच आज कोरोनाची पहिली लस लागू करून आरोग्यसेवेशी संबंधित लोकांप्रति, समाज एक प्रकारे आपले कर्ज चुकवत आहेत.ही लस त्या सर्व सहकाऱ्यांप्रति आदरांजली आहे.' याआधी पंतप्रधान असे म्हणाले की, या साथीच्या काळात भारताने ज्या प्रकारे व्यवहार केला त्याचे संपूर्ण जगात कौतुक होत आहे.केंद्र आणि राज्य सरकारे, स्थानिक संस्था, प्रत्येक सरकारी संस्था, सामाजिक संस्था एकत्र कसं काम करू शकतात, याचं उदाहरण भारताने जगासमोर ठेवले.
First published:

Tags: Corona, Corona vaccine, Narendra modi, PM narendra modi

पुढील बातम्या