मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /COVID-19 Vaccination: 31 डिसेंबरपर्यंत सर्वांना नाही मिळणार कोरोना लशीचे दोन्ही डोस पण...

COVID-19 Vaccination: 31 डिसेंबरपर्यंत सर्वांना नाही मिळणार कोरोना लशीचे दोन्ही डोस पण...

कोरोना (Coronavirus Vaccination) प्रतिबंधक लसीकरणासाठी पात्र असलेल्या देशातल्या सर्व 94 कोटी प्रौढ नागरिकांना लशीचे (Anti Covid Vaccine) दोन्ही डोस देण्याचं उद्दिष्ट डिसेंबर 2021पर्यंत गाठलं जाण्याची शक्यता नाही मात्र...

कोरोना (Coronavirus Vaccination) प्रतिबंधक लसीकरणासाठी पात्र असलेल्या देशातल्या सर्व 94 कोटी प्रौढ नागरिकांना लशीचे (Anti Covid Vaccine) दोन्ही डोस देण्याचं उद्दिष्ट डिसेंबर 2021पर्यंत गाठलं जाण्याची शक्यता नाही मात्र...

कोरोना (Coronavirus Vaccination) प्रतिबंधक लसीकरणासाठी पात्र असलेल्या देशातल्या सर्व 94 कोटी प्रौढ नागरिकांना लशीचे (Anti Covid Vaccine) दोन्ही डोस देण्याचं उद्दिष्ट डिसेंबर 2021पर्यंत गाठलं जाण्याची शक्यता नाही मात्र...

  अमन शर्मा, नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर: कोरोना (Coronavirus Vaccination) प्रतिबंधक लसीकरणासाठी पात्र असलेल्या देशातल्या सर्व 94 कोटी प्रौढ नागरिकांना लशीचे (Anti Covid Vaccine) दोन्ही डोस देण्याचं उद्दिष्ट डिसेंबर 2021पर्यंत गाठलं जाण्याची शक्यता नाही; मात्र सरकार तोपर्यंत या सर्वांना पुरतील एवढे डोसेस उपलब्ध करून देणार आहे. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी न्यूज 18ला ही माहिती दिली. आतापर्यंत देशातल्या 74 कोटींहून अधिक प्रौढांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस (Vaccine Doses) घेतला आहे. तसंच 35 कोटी नागरिकांनी दोन्ही डोसेस घेतले आहेत. सुमारे 20 कोटी प्रौढांनी एकही डोस घेतलेला नाही. लसीकरणासाठी पात्र असलेल्या सर्व प्रौढ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लशींचे (Anti Covid Vaccination) दोन्ही डोसेस देण्यासाठी 188 कोटी डोसेसची गरज आहे. त्यापैकी आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण लशींच्या मात्रा 109 कोटींहून अधिक झाल्या आहेत.

  एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'लशींच्या डोसेसची उपलब्धता हा काही आता अडचणीचा मुद्दा नाही. आपण निर्यातही सुरू केली आहे. आता लशी घेण्यासाठी नागरिकांनी पुढे यायला हवं. तसंच काही मोठी राज्यं यात मागे राहिली आहेत, त्यांनी बरंच काही करण्याची गरज आहे. घरोघरी लसीकरण पूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारने 'हर घर दस्तक' हा कार्यक्रम सुरू केला आहे.'

  हे वाचा-सावधान! माणसांपाठोपाठ आता पाळीव प्राण्यांमध्ये आढळला कोरोनाचा 'अल्फा' व्हेरिएंट

  दुसऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विविध राज्यं आणि खासगी हॉस्पिटल्समध्ये 20 कोटींहून अधिक डोसेस पडून आहेत. 'चार-पाच कोटी डोसेस खासगी हॉस्पिटल्सच्या स्टॉकमध्ये असून, जवळपास 16 कोटी डोसेस राज्य सरकारांच्या स्टॉकमध्ये आहेत. आतापर्यंत देशभरात एकूण 109 कोटी डोसेस देण्यात आले असून, एकूण 130 कोटी डोसेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत,' असं त्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.

  हे वाचा-कोरोना परत आला; 24 तासात या देशात सापडले तब्बल 37,120 नवीन रुग्ण!

  आतापर्यंत कोणत्याच देशाने 100 टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य केलेलं नाही. सर्व पात्र प्रौढ नागरिकांना दोन्ही डोसेस देण्यासाठी एकूण 188 कोटी डोसेसची गरज आहे. त्यापैकी 109 कोटी डोसेस आतापर्यंत देऊन झाले आहेत. झायडस कॅडिला (Zydus Cadila) आणि बायोलॉजिकल ई (Biological E) या दोन नव्या लशींच्या स्टॉकव्यतिरिक्त नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कोविशिल्ड (Covidshield) लशीचे 44 कोटी, तर कोव्हॅक्सिन (Covaxin) लशीचे 10 कोटी डोसेस प्राप्त होण्याची शक्यता आहे. कोविशिल्ड लशीच्या दोन्ही डोसेसमध्ये 84 दिवसांचं अंतर आहे. आतापासून 31 डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत उर्वरित 20 कोटी नागरिकांना पहिला डोस देण्यास भारत सक्षम आहे. ती गरज पूर्ण करण्याएवढ्या लशी भारताकडे सहज उपलब्ध आहेत. या नागरिकांना दुसरा डोस घेण्यासाठी 2022 साल उजाडण्याची वाट पाहण्यावाचून पर्याय नाही.

  First published:

  Tags: Corona, Corona vaccination, Coronavirus cases