24 तासांत कोरोनानं मोडले सर्व रेकॉर्ड! सर्वात जास्त नवीन आणि मृत रुग्णांची नोंद

24 तासांत कोरोनानं मोडले सर्व रेकॉर्ड! सर्वात जास्त नवीन आणि मृत रुग्णांची नोंद

आतापर्यंत एका दिवसात सापडलेल्या कोरोना रुग्णांचा हा आकडा सर्वात जास्त आहे. याआधी 6 सप्टेंबर रोजी 93 हजार 723 कोरोना रुग्ण सापडले होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 44 लाखांच्या घरात गेली आहे. गेल्या 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक 95 हजार 735 नवीन रुग्ण सापडले. आतापर्यंत एका दिवसात सापडलेल्या कोरोना रुग्णांचा हा आकडा सर्वात जास्त आहे. याआधी 6 सप्टेंबर रोजी 93 हजार 723 कोरोना रुग्ण सापडले होते. तर एका दिवसात 1172 जणांचा मृत्यू झाला. यासह एकूण मृतांची संख्या 75 हजार 62 झाली आहे.

यात दिलासादायक बाब म्हणजे भारत हा जगातला दुसरा देश ठरला आहे, जेथे सर्वात जास्त रुग्ण निरोगी झाले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार देशात 34 लाख 71 हजार 784 रुग्ण निरोगी झाले आहेत. भारताचा रिकव्हरी रेट 77.74% आहे. असे असले तरी देशात अजूनही 9 लाख 19 हजार 18 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

भारतातील मृतांची संख्या वाढत आहे. जगभरातील एकूण रुग्णांच्या 54 टक्के रुग्ण हे अमेरिका, भारत आणि ब्राझीलमधील आहेत. या तीन देशांमध्ये सर्वात जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

5 कोटी 29 लाखहून अधिक सॅंपल टेस्ट

ICMR च्य मते 9 सप्टेंबरपर्यंत कोरोनाचे एकूण 5 कोटी 29 लाख सॅंपल टेस्ट केले गेले. यांपैकी 11 लाख सॅंपल टेस्टिंग बुधवारी करण्यात आली. देशाचा पॉझिटिव्हिटी रेट 7 टक्क्यांनी कमी झाला आहे.

मृत्यूदरात घट तर रिकव्हरी रेट वाढला

दिलासादायक बाब म्हणजे मृत्यू दर आणि अॅक्टिव्ह रुग्ण यांच्यात घट होत आहे. देशाचा मृत्यू दर 1.68% झाला आहे. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 21% झाली आहे. याचबरोबर रिकव्हरी रेट 78% झाला आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: September 10, 2020, 10:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading