COVID-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे वाढली चिंता! कोरोनामुक्त झालेल्या 'या' देशांमध्ये पुन्हा घुसला व्हायरस

COVID-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे वाढली चिंता! कोरोनामुक्त झालेल्या 'या' देशांमध्ये पुन्हा घुसला व्हायरस

दुसरीकडे आता ज्या देशांनी कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे, तेथेच आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आलेली दिसत आहे.

  • Share this:

बर्लिन, 22 सप्टेंबर : कोरोनाबाधितांची संख्या अद्याप कमी होताना दिसत नाही आहे. दुसरीकडे आता ज्या देशांनी कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे, तेथेच आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आलेली दिसत आहे. अशाच एका देशामध्ये कोरोनाची प्रकरणं दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अशी परिस्थिती आहे जर्मनीची. जर्मनीने कोरोनावर खूप आधी नियंत्रण मिळवले होते, मात्र नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीने या देशाची चिंता वाढविली आहे. जर्मनीमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याचे मानले जात आहे.

रॉबर्ट कोच संस्थेने इंस्टीट्यूट (Robert Koch Institute) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी जर्मनीमध्ये कोरोनाचे 1,821 नवीन रुग्ण आढळून आले. यासह, एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 2 लाख 74 हजार 158 झाली आहे. तर, कोरोनामुळे आतापर्यंत 9,396 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीच्या काळात जर्मनीमध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने होत होता. जर्मनीचे चान्सल अँजेला मर्केल यांचे एक निवेदन आले होते, ज्यामुळे जर्मनीतील लोकांना घाम फुटला होता.

वाचा-Iodine ने फक्त 15 सेकंदात केला कोरोना व्हायरसचा नाश; तज्ज्ञांचा दावा

मर्केल यांनी असे सांगितले होते की, जर्मनीतील 70 टक्के लोकसंख्या म्हणजेच 5.80 कोटी लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते. त्यानंतर जर्मनीने कोरोना नियंत्रित करण्यास सुरवात केली. यात त्यांना यशही आले.

वाचा-COVID-19: पुण्यातही नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या पेशंट्समध्ये झाली वाढ!

जर्मनीने टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रॅकिंगवर जोर दिला. आयसीयूची संख्या वाढवली. बेडची संख्या वाढवण्याकडेही लक्ष देण्यात आले. कोरोनाबाबत लोकांना जागृक करण्यात आले. या सगळ्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झालेली पाहायला मिळाली. मात्र आता पुन्हा जर्मनीत कोरोनाची दुसरी लाट आली आहे.

वाचा-50 वर्षांचा संसार Covid मुळे संपला; हातात हात धरूनच दोघांनीही घेतला अखेरचा श्वास

जर्मनीबरोबरच फ्रान्समध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. फ्रान्सच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, गेल्या 24 तासांत देशात 10,569 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: September 22, 2020, 3:44 PM IST

ताज्या बातम्या