Home /News /coronavirus-latest-news /

चिंता वाढली! महाराष्ट्रात 10 पैकी एका कोरोना पॉझिटिव्ह गरोदर महिलेत COVID-19 ची लक्षणच दिसत नाहीत

चिंता वाढली! महाराष्ट्रात 10 पैकी एका कोरोना पॉझिटिव्ह गरोदर महिलेत COVID-19 ची लक्षणच दिसत नाहीत

महाराष्ट्रातील गरोदर महिलांमध्ये कोरोनाच्या बाधेसंबंधी एक सर्वेक्षण नुकतंच करण्यात आलं. यामध्ये असं दिसून आलं की 1140 गरोदर महिलांपैकी 141 महिला कोरोनाबाधित आहेत.

  मुंबई, 01 ऑक्टोबर : कोरोनाच्या काळात आरोग्याशी संबंधित संशोधनांना विशेष महत्त्व आहे त्यात ते कोरोनाबद्दल असेल तर अत्यंत महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातील गरोदर महिलांमध्ये कोरोनाच्या बाधेसंबंधी एक सर्वेक्षण नुकतंच करण्यात आलं. यामध्ये असं दिसून आलं की 1140 गरोदर महिलांपैकी 141 महिला कोरोनाबाधित आहेत. हे प्रमाण 12.3 टक्के होतं. प्रसूतीसाठी हॉस्पटलमध्ये दाखल होताना या गरोदर महिलांची चाचणी केली तर 10 महिलांपैकी एका महिलेमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली नाहीत, असा निष्कर्ष मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्युट फॉर रीसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ (NIRRH) व ICMR या संस्थांनी केलेल्या अभ्यासातून काढण्यात आला आहे. युरोपियन जर्नल ऑफ ऑबस्ट्रेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी अँड रिप्रॉडक्टिव बायॉलॉजीमध्ये हा संशोधन प्रंबंध प्रकाशित करण्यात आला आहे. वाचा-सावधान! महाराष्ट्रात येतोय कोरोनापेक्षा भयंकर काँगो फीव्हर, जाणून या तापाविषयी 15 हॉस्पिटलची माहिती घेण्यात आली प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या किंवा येत्या पाच दिवसांत प्रसूत होण्याची शक्यता असलेल्या गरोदर महिलांच्या तपासण्यांवरून हा अभ्यास करण्यात आला. महाराष्ट्रातील 15 हॉस्पिटलमध्ये 25 एप्रिल ते 20 मे 2020 या काळात दाखल झालेल्या महिलांची माहिती या अभ्यासासाठी घेण्यात आली. मुंबईतील टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या 141गरोदर महिला आणि नायर हॉस्पिटलमध्ये असलेल्या 180 कोरोनाबाधित गरोदर महिलांची माहिती या अभ्यासासाठी घेण्यात आली होती. या अभ्यासातून असं लक्षात आलं की यापैकी फक्त 11.5 टक्के महिलांना कोरोनाची लक्षणं दिसत होती बाकीच्या 88.5 टक्के महिला कोरोनाबाधित असूनही त्यांच्यात तशी लक्षणं दिली नाहीत. वाचा-कोरोनामुळे महिलांपेक्षा पुरुषांचा मृत्यू जास्त का? समोर आलं धक्कादायक कारण ‘लक्षणं नसली तरी कोरोनाचा चाचणी करावी’ NIRRHचे अधिकारीआणि या अभ्यासाचे सहसंशोधक डॉ. दीपक मोदी म्हणाले, ‘साधारणपणे गरोदर महिलेची प्रतिकारशक्ती कमी असते त्यामुळे तिला संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे गरोदर महिलेने कोविडची चाचणी करणं महत्त्वाचं आहे.’ द इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनी (ICMR) लक्षणं दिसत असली किंवा नसली तरीही गरोदर महिलांनी SARS-CoV-2 ची चाचणी करून घ्यावी असंच सांगितलं आहे. पोटातील बाळाला व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना होण्याचा धोका असतो त्यामुळे गरोदर महिलांनी ही चाचणी करायलाच हवी असं ICMR म्हटलं आहे. वाचा-कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळ! बनावट इंजेक्शन बाजारात? समोर आली धक्कादायक माहिती
  गर्भवती महिलांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे धोका डीबीटी- वेलकम ट्रस्ट इंडिया अलायन्सचे सीईओ आणि व्हायरॉलॉजिस्ट डॉ. शाहिद जमील म्हणाले, ‘गरोदरपणात बाळाचं संरक्षण करण्यासाठी आईची प्रतिकारशक्ती गर्भ आणि आईमध्ये विभागली जाते. त्यामुळे नक्कीच गरोदर महिलांना संसर्ग होण्याचा खूप मोठा धोका असतो. कॅन्सरमधून बऱ्या होणाऱ्या एखाद्या रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने त्याला जसा संसर्गाचा धोका असतो तसाच गरोदर महिलांना असतो. या अभ्यासातून लक्षणं न जाणवणारे रुग्ण शोधून काढल्यामुळे पोटातील बाळ, आरोग्य कर्मचारी आणि समाजातील इतर घटकांमध्ये होणारा संसर्ग रोखण्यासाठी आम्हाला मदत झाली, असं मत NIRRHचे अधिकारीआणि या अभ्यासाचे सहसंशोधक डॉ. राहुल ग्जभिये यांनी व्यक्त केलं.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Corona, Coronavirus

  पुढील बातम्या