Home /News /coronavirus-latest-news /

24 तासांत सर्वात कमी रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट वाढताच! पाहा लेटेस्ट आकडेवारी

24 तासांत सर्वात कमी रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट वाढताच! पाहा लेटेस्ट आकडेवारी

पुण्यात सोमवारी दिवसभरात गेल्या पाच महिन्यातील निच्चांकी कोरोना रूग्णवाढ नोंदविण्यात आली. दिवसभरात अवघे 147 रूग्ण आढळून आले आहेत.

पुण्यात सोमवारी दिवसभरात गेल्या पाच महिन्यातील निच्चांकी कोरोना रूग्णवाढ नोंदविण्यात आली. दिवसभरात अवघे 147 रूग्ण आढळून आले आहेत.

गेल्या 24 तासांत 61 हजार 267 नवे रुग्ण सापडले तर, 884 लोकांचा मृत्यू झाला. सलग तिसऱ्या दिवशी मृतांचा आकडा कमी झाला आहे.

    नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर : देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 66 लाख 85 हजार 083 झाली आहे. गेल्या 24 तासांत 61 हजार 267 नवे रुग्ण सापडले तर, 884 लोकांचा मृत्यू झाला. सलग तिसऱ्या दिवशी मृतांचा आकडा कमी झाला आहे. आतापर्यंत देशात 1 लाख 3 हजार 569 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 75 हजार 675 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासह एकूण 56 लाख 62 हजार 491 लोकं आतापर्यंत निरोगी झाली आहेत. गेल्या 26 दिवसांपासून भारताचा अॅक्टिव्ह रेटमध्ये घट झाली आहे. 10.17 लाखवरून आता सध्या देशात 9.19 लाख अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आकडे पाहिल्यास गेल्या एका महिन्यात 4 सप्टेंबरपासून ते 4 ऑक्टोबरपर्यंत 28.77 लाख नवे रुग्ण वाढले. तर, 27.91 रुग्ण निरोगी झाले आहेत. वाचा-अलर्ट! मानवी त्वचेवर 9 तास जिंवत राहू शकतो Corona वाचा-अशा लोकांना कोरोना पडणार भारी; लशीचाही परिणाम होणार नाही तर, गेल्या एका महिन्यात 37 हजार 687 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या एका महिन्यात 88 हजार 566 अॅक्टिव्ह रुग्ण कमी झाले आहेत. आतापर्यंत किती टेस्टिंग? ICMRने दिलेल्या आकडेवारीनुसार, 5 ऑक्टोबर पर्यंत एकूण 8 कोटी 10 लाख 71 हजार 797 सॅंपल टेस्ट केले गेले आहेत. यातील 10 लाख 89 हजार टेस्टिंग काल करण्यात आली. सध्या देशात पॉझिटिव्हिटी रेट 7 टक्के आहे. वाचा-भारताच्या कोरोना लशीची ताकद वाढणार; COVAXIN मध्ये मिसळणार विशेष घटक जगभरात 3.56 कोटीहून अधिक केस जगभरातील एकूण संक्रमितांचा आकडा 3.56 कोटी झाला आहे. तर, आतापर्यंत 2 कोटी 68 लाख 59 हजार 709 रुग्ण निरोगी झाले आहेत. मृतांचा आकडा 10.33 लाखपर्यंत पोहचला आहे. हे आकडे www.worldometers.info/coronavirus नुसार आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Coronavirus

    पुढील बातम्या