नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : देशातील कोरोनाव्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या रोज नवनवीन रेकॉर्ड रचत आहे. गुरुवारी कोरोना रुग्णांनी आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले. एकाच दिवसात तब्बल 96 हजार 551 नवीन रुग्णांची नोंद झाली. नवीन कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता लवकरच देशात 1 लाख रुग्ण संख्याही नोंदवली जाऊ शकते. एवढेच नाही तर आज 1209 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 45 लाख 62 हजार 414 झाली आहे.
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 9 लाख 43 हजार 480 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 76 हजार 271 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 35 लाख 42 हजार 663 लोकं निरोगीही झाले आहेत.
India's #COVID19 case tally crosses 45 lakh mark with a spike of 96,551 new cases & 1,209 deaths reported in the last 24 hours.
— ANI (@ANI) September 11, 2020
The total case tally stands at 45,62,415 including 9,43,480 active cases, 35,42,664 cured/discharged/migrated & 76,271 deaths: Ministry of Health pic.twitter.com/cAnTFUvmnq
ICMRने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांत 11 लाख 63 हजार 542 रुग्णांची चाचणी करण्यात आली. आतापर्यंत एकूण 5 कोटी 40 लाख 97 हजार 975 चाचण्या झाल्या आहेत. ICMRने असे सांगितले की, कोरोना चाचण्या केल्यामुळे रुग्णांवर उपचार करणे जास्त सोयीस्कर झाले आहे.
मे महिन्यात तब्बल 64 लाख लोकांना झाला कोरोना
देशात सुरू असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, ICMR ने केलेल्या पहिल्या राष्ट्रीय सेरो सर्वेक्षणांचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या सुरूवातीला, 0.73% प्रौढ म्हणजेच तब्बल 64 लाख (64,68,388) लोक कोरोना विषाणूच्या धोक्यामध्ये होते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सर्वेक्षणानुसार, प्रत्येक RT-PCR चाचणीत एक पॉझिटिव्ह प्रकरण समोर येत होतं. त्यावेळी 82-130 अशी संक्रमणाची प्रकरणं समोर होती. कोरोनाची ही अवस्था तेव्हा होती जेव्हा देशभर लॉकडाऊन होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona virus in india