सलग पाचव्या दिवशी अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट, तरी महाराष्ट्रातील आकडेवारी चिंताजनक

सलग पाचव्या दिवशी अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट, तरी महाराष्ट्रातील आकडेवारी चिंताजनक

कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 5 हजार 526 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 58 लाख 27 हजार 705 लोकं आतापर्यंत रिकव्हर झाले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर : भारतातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 68 लाख 35 हजार 656 झाली आहे. गेल्या 24 तासांत 78 हजार 524 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, 971 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 5 हजार 526 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 58 लाख 27 हजार 705 लोकं आतापर्यंत रिकव्हर झाले आहेत.

देशाचा पॉझिटिव्हिटी रेट 8.3% असून 100 टेस्टपैकी आठ लोकं कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. देशात अजूनही 9 लाख 2 हजार 425 अॅक्टिव्ह केस आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडु सह 10 राज्य अशी आहे जेथे 77% अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. यांपैकी तीन राज्यात महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ येथे अजूनही 50% अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या गेल्या दोन आठवड्यांपासून कमी होत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात 48% रुग्णांचा मृत्यू हा 8 राज्यांतील 25 जिल्ह्यात झाला आहे. यातील 15 जिल्हे हे फक्त महाराष्ट्रातील आहेत. तर, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि गुजरातमधील प्रत्येकी 2-2 तर पंजाब, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तामिलनाळूमधील प्रत्येकी एका-एका जिल्ह्यात आहेत.

जगभरात 3.60 कोटी कोरोना रुग्ण

जगभरात सध्या 3.60 कोटी कोरोना रुग्ण आहेत. यातील 10 लाख 59 हजार (2.92%) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 कोटी 74 लाखहून (75%) अधिक रुग्ण निरोगी झाले आहेत. संपूर्ण जगभरात 79 लाख रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. गेल्या 24 तासांत भारत आणि अमेरिकेनंतर ब्राझील, फ्रान्स, अर्जेंटीना, इंग्लंड, रशिया आणि कोलंबियामध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत. तर, भारतात सर्वात जास्त मृत्यू झाले आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: October 8, 2020, 10:04 AM IST

ताज्या बातम्या