Home /News /coronavirus-latest-news /

गाडी चालवताना मास्क घालताय का? असं न केल्यास 'या' शहरात भरावा लागतोय दंड

गाडी चालवताना मास्क घालताय का? असं न केल्यास 'या' शहरात भरावा लागतोय दंड

स्वत:च्या वाहनांमध्येही मास्क घालायचा की नाही या संदर्भात काही प्रमाणात गोंधळ उडाला असताना आता सरकारनं याबाबत घोषणा केली आहे.

    नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी दिल्ली मात्र रुग्णांची संख्या थांबता थांबत नाही आहे. दिल्लीतील कोव्हिड-19 च्या वाढत्या रुग्णांमुळे आम आदमी पक्षाच्या सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्याबद्दल दंड 2000 पर्यंत वाढवण्यात आला आहे. गुरुवारी ही घोषणा करण्यात आली असून त्यात खासगी वाहनांमध्ये मास्क नसलेल्यांनाही दंड ठोठावला जाईल असे स्पष्ट केलं गेलंय. या महिन्यात दिल्लीतील पॉझिटिव्ह कोव्हिड-19 केसेसमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. हिवाळा, प्रदूषणाची वाढती पातळी याचबरोबर इतर अनेक कारणं कोरोना रुग्णवाढीला कारणीभूत असू शकतात. पूर्वी स्वत:च्या वाहनांमध्येही मास्क घालायचा की नाही या संदर्भात काही प्रमाणात गोंधळ उडाला असताना, दिल्ली सरकारने बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, खासगी वाहनसुद्धा सार्वजनिक ठिकाण मानलं जातं. वाचा-मोठी बातमी! भारतात पहिल्यांदाच मंत्र्यानं घेतली CORONA VACCINE; लस घेताना VIDEO न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात असे सांगितले की मास्क घालण्याबाबतची मार्गदर्शक तत्वं 'स्पष्ट' आहेत आणि ती सर्व 'सार्वजनिक ठिकाणी' लागू होतात, आणि वैयक्तिक वाहन सुद्धा याच श्रेणीत येत असून त्यांना प्रायव्हेट झोन म्हणता येणार नाही. एकाने कोर्टात याचिका करून खासगी गाडी हे खासगी ठिकाण ठरवावं अशी मागणी केली होती. वाचा-पुण्यातील 85% लोकांमध्ये सापडल्या अँटीबॉडिज, देशातील पहिलाच प्रकार त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की मास्क न घालणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी हा दंड वाढवला जात आहे. "दिल्लीत मोठ्या संख्येने लोक मास्क घालतात पण अजूनही काहींनी ते घातलेले नाहीत. जर कोणी सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातलेला आढळला तर त्याला 2000 रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल," ते म्हणाले. "आत्तापर्यंत हा दंड 500 रुपये होता. जर आपण मास्क घातला तर लोकांमध्ये कोव्हिड-19 चा संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे." वाचा-सर्वांपर्यंत कोरोना लस पोहोचवायची असेल तर हे करा - उद्योजिकेचा अभिनव उपाय दिल्लीच्या वाढत्या केसेसमुळे आता शेजारच्या राज्यांनी सुद्धा एक पाऊल पुढे होऊन दिल्लीहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करायला सुरुवात केली आहे. दिल्लीच्या पूर्व उपनगरामधील डीएनडी उड्डाणपूल आणि चिल्लामार्गे प्रवास करणाऱ्या लोकांसाठी रँडम टेस्टिंगला मान्यता देताना उत्तर प्रदेशातील गौतमबुद्धनगर जिल्हा प्रशासनाने मंगळवारी एक आदेश जाहीर केला. बाइक चालकांचे म्हणणे आहे की हे त्यांच्यासाठी त्रासदायक आहे, परंतु अजून तरी असं रँडम टेस्टिंग सुरु असल्याचे काही पुरावे नाहीत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Coronavirus

    पुढील बातम्या