'...तर कोरोना पसरलाच नसता!', चीन आणि WHOची पोलखोल करणारा 96 पानांचा रिपोर्ट आला समोर

'...तर कोरोना पसरलाच नसता!', चीन आणि WHOची पोलखोल करणारा 96 पानांचा रिपोर्ट आला समोर

अमेरिकन संसदेच्या समितीने 96 पानांचा रिपोर्ट तयार केला आहे. चीनमध्ये सत्ता असलेल्या कम्युनिस्ट पक्षाने कोरोना संबंधित पुरावे आणि डेटा नष्ट केला, असा दावाही यात करण्यात आला आहे.

  • Share this:

न्यूयॉर्क, 22 सप्टेंबर : चीनमुळे जगभरात कोरोना (Coronavirus) पसरला, असा आरोप अजूनही केला जात आहे. मात्र आता यासंबंधी ठोस पुरावे अमेरिकेनं सादर केले आहेत. अमेरिकेच्या संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीच्या रिपोर्टमध्ये, कोरोना टाळता आला असता, असे सांगण्यात आले आहे. या रिपोर्टनुसार, कोरोनाचा उद्रेक होण्याच्या सुरुवातीच्या काळात चीनने काही गोष्टी लपविल्या नसत्या तर कोरोनाचा प्रसार टाळता आला असता. रिपोर्टमध्ये यासाठी जागतिक आरोग्य संघटनेलाही (WHO) जबाबदार ठरवण्यात आले आहे.

न्यूयॉर्क पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, अमेरिकन संसदेच्या समितीने 96 पानांचा रिपोर्ट तयार केला आहे. चीनमध्ये सत्ता असलेल्या कम्युनिस्ट पक्षाने कोरोना संबंधित पुरावे आणि डेटा नष्ट केला, असा दावाही यात करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर चीनने आपल्या देशाची सप्लाय चेन चांगली ठेवण्यासाठी अमेरिकन कंपन्यांच्या निर्यातीवर मर्यादा आणल्या.

वाचा-ओळख आहे? तरच मिळेल ICU बेड; Coronavirus सर्वेक्षणातून समोर आली भीषण परिस्थिती

रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, चिनी कम्युनिस्ट पक्षाने आरोग्याशी संबंधित माहिती सक्रियपणे लपविली, तसेच जगाला इशारा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर आणि पत्रकारांना गायब केले. त्याचबरोबर या रिपोर्टमध्ये WHOवर चीनशी संगनमत असल्याचा आरोपही केला होता. त्यामुळे WHOचे प्रमुख टेड्रोस अॅडह्रनम घेब्रियेसुस यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली आहे.

वाचा-ताप आल्यावर साधा फ्लू आहे की कोरोना कसं ओळखायचं? काय आहे फरक

या 96 पानी रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की जर चीन अधिक पारदर्शक आणि सक्रिय झाला असता तर 2019 च्या अखेरीस कोरोना सुरू झाल्यानंतरच याचा संसर्ग रोखता आला असता. यामुळे कोट्यवधी लोकांचा जीव वाचला असता. जगभरात सध्या कोरोनाची एकूण 3.15 कोटी रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 9.7 लाख लोकांचा जीव गेला आहे. अमेरिका आणि भारतात सर्वात जास्त कोरोना रुग्ण आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: September 22, 2020, 5:20 PM IST

ताज्या बातम्या