करून दाखवलं! एका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त

करून दाखवलं! एका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त

24 तासांत 86 हजार 061 रुग्ण निरोगी झाले. आतापर्यंत एकूण 51 लाख 87 हजार 826 रुग्ण निरोगी झाले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : भारतातील एकूण कोरोनाबाधितांची (Covid-19 Infected) संख्या आता 62 लाख 25 हजार 764 झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाची 80 हजार 472 नवीन प्रकरणं समोर आली. तर, एकाच दिवसात 1179 लोकांचा मृत्यू झाला. यासह एकूण मृतांची संख्या आता 97 हजार 497 झाली आहे. तर, 24 तासांत 86 हजार 061 रुग्ण निरोगी झाले. आतापर्यंत एकूण 51 लाख 87 हजार 826 रुग्ण निरोगी झाले आहेत. सध्या देशात 9 लाख 40 हजार 441 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिन राजेश भूषण यांनी दुसऱ्या सीरो सर्व्हेमध्ये सांगितले की, अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. 17 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर दरम्यान 29,082 लोकांचा सर्व्हे केला गेला, यात 6.6% लोकांचा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. सर्व्हेनुसार ऑगस्टमध्ये 10 वर्षांहून अधिक वयोगटातील प्रत्येक 15 मधील एकाचा कोरोनाची लागण झाली आहे.

वाचा-कोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन

वाचा-मुंबई, पुण्याची नवीन रुग्णसंख्या घटली; पण Covid मृत्यूंचा आकडा वाढला

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार (ICMR) 29 सप्टेंबरपर्यंत एकूण 7 कोटी 41 लाख सॅंपल टेस्ट करण्यात आले. यातील 11 लाख सॅपलची टेस्टिंग काल करण्यात आली.

मृत्यूदरात घट

दिलासादायक बाब म्हणजे मृत्यूदर आणि अॅक्टिव्ह रेट यांच्यात घट झालेली पाहायला मिळत आहे. मृत्यूदर सध्या 1.57% झाला आहे. तर, अॅक्टिव्ह रेट 15% आहे. यासह देशाचा रिकव्हरी रेट वाढत आहे. सध्या रिकव्हरी रेट 83% आहे. गेल्या काही दिवसांपासून नवीन रुग्णांपेक्षा निरोगी रुग्णांची संख्या जास्त आहे.

वाचा-नो मास्क, नो एन्ट्री! महापालिका आयुक्तांकडून कारवाई अधिक तीव्र करण्‍याचे निर्देश

जगभरात काय आहे परिस्थिती ?

जगभरात सध्या 3 कोटी 35 लाख 49 हजार 873 एकूण कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यांपैकी 10 लाख 6 हजार 379 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चांगली बाब म्हणजे 2 कोटी 48 लाख 78 हजार 124 रुग्ण निरोगीही झाले आहे. अमेरिका, भारत आणि ब्राझिल हे तीन देश सर्वात जास्त प्रभावित आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: September 30, 2020, 9:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading