दिलासादायक! अखेर 6 दिवसांनी रुग्णांच्या संख्येत घट, रिकव्हरी रेट वाढला; वाचा लेटेस्ट आकडेवारी

दिलासादायक! अखेर 6 दिवसांनी रुग्णांच्या संख्येत घट, रिकव्हरी रेट वाढला; वाचा लेटेस्ट आकडेवारी

आज तब्बल सहा दिवसांनी नवीन रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळाली. गेल्या 24 तासांत 83 हजार 809 नवीन रुग्ण सापडले.

  • Share this:

दिल्ली, 15 सप्टेंबर : देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 50 लाखांच्या घरात जाण्याच्या मार्गावर आहे. असे असले तरी आज तब्बल सहा दिवसांनी नवीन रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळाली. गेल्या 24 तासांत 83 हजार 809 नवीन रुग्ण सापडले. यासह एकूण रुग्णांच्या संख्या आता 49 लाख 26 हजार 734 झाली आहे. तर, एकाच दिवसात 1 हजार 54 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह मृतांचा आकडा 80 हजारपार गेला आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 38 लाख 56 हजार 157 रुग्ण निरोगी झाली आहेत. सोमवार एकाच दिवसात 79 हजार 113 रुग्णांचा डिस्चार्ज देण्यात आला. आंध्र प्रदेश, तामिळनाडु, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार आणि तेलंगणात सोमवारी सर्वात जास्त रुग्ण निरोगी झाले. देशात सध्या 9 लाख 89 हजार 234 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

वाचा-कोरोना लशीबाबत महत्त्वाची माहिती लपवत आहेत कंपन्या, तज्ज्ञांनी केलं अलर्ट

वाचा-सरकारच्या एका निर्णयामुळे 38 हजार लोकांचा वाचला जीव, आरोग्य मंत्र्यांचाा दावा

महाराष्ट्राचा रिकव्हरी घटला

देशातील निरोगी राज्यांबाबत बोलायचे झाल्यास, महाराष्ट्र यात आघाडीवर आहे. मात्र रिकव्हरी रेटमध्ये तामिळनाडूचा क्रमांका पहिला आहे. महाराष्ट्रात 10 लाख 60 हजार 308 एकूण रुग्ण आहेत, यातील 7 लाख 40 हजार 061 रुग्ण निरोगी झाले आहेत. तर, युपीचा रिकव्हरी रेट 76.74%, आंध्र प्रदेश 82.36%, तामिळनाडू 88.98% आणि कर्नाटकाचा 76.82% आहे.

इतर राज्यांची परिस्थिती

वाचा-प्रत्येकापर्यंत लस पोहोचायला उजाडेल 2024 साल; Serum च्या प्रमुखांनी केलं स्पष्ट

जगभरातील परिस्थिती

जगभरात गेल्या 24 तासांत 1 लाख 80 हजारहून अधिक रुग्ण सापडले. तर, 3 हजार रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जगभरातील एकूण रुग्णांची संख्या आता 2 कोटी 93 लाख 70 हजार 32 झाली आहे. तर, 9 लाख 31 हजार 74 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात आतापर्यंत 2 कोटी 11 लाख 80 हजार 84 रुग्ण निरोगीही झाले आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: September 15, 2020, 9:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading