देशात कोरोनाचा विस्फोट! सलग दुसऱ्यादिवशी धक्कादायक आकडेवारी समोर

देशात कोरोनाचा विस्फोट! सलग दुसऱ्यादिवशी धक्कादायक आकडेवारी समोर

कोरोना व्हायरसवर यशस्वीपणे मात देऊन बरे होणाऱ्यांची संख्या देशात आतापर्यंत 8 लाख 49 हजाराहून अधिक आहे.

  • Share this:

मुंबई, 25 जुलै: कोरोनाचा संसर्ग आणि विषाणूंचं संक्रमण होण्याचा वेग वाढत असला तरीही गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी संक्रमित झालेल्यांची संख्या कमी आहे. 24 तासांस ICMR ने साधारण 4 लाख 20 हजार 898 लोकांची कोरोना चाचणी केली. गुरुवारच्या तुलनेत 68,097 नवीन लोकांची चाचणी करण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी 48 हजार 916 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळल्यानं कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 13,36, 861वर पोहोचला आहे. यापैकी 4 लाख 56 हजार 071 रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 24 तासांत कोरोनामुळे 757 लोकांचा मृत्यू झाल्यानं आतापर्यंत मृतांचा आकडा 31 हजार 358 वर पोहोचली आहे.

हे वाचा-कोल्हापूर जिल्ह्यात संतापजनक प्रकार, बेड न मिळाल्याने 3 रुग्णांचा मृत्यू

कोरोना व्हायरसवर यशस्वीपणे मात देऊन बरे होणाऱ्यांची संख्या देशात आतापर्यंत 8 लाख 49 हजाराहून अधिक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात मृत्यूचे प्रमाण 2.3 टक्के तर कोरोना व्हायरसमधून बरे होण्याचा रिकव्हरी रेट हा 63.5 टक्के आहे. कोरोना संसर्गाच्या बाबतीत भारत जगभरात सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.

ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात आता एकूण 3.5 लाखांवर कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला आहे. तामिळनाडूमध्ये जवळपास 2 लाख कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात आणि दिल्लीत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 25, 2020, 10:53 AM IST

ताज्या बातम्या