मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

दुसऱ्या लाटेशी लढाई सुरू असताना तिसऱ्या लाटेचं सावट! वाचा कधी धडकणार Corona Third Wave?

दुसऱ्या लाटेशी लढाई सुरू असताना तिसऱ्या लाटेचं सावट! वाचा कधी धडकणार Corona Third Wave?

पुण्यात कोरोनाची साथ नियंत्रणात मात्र शेजारील जिल्ह्याने वाढवली चिंता (प्रातिनिधिक फोटो)

पुण्यात कोरोनाची साथ नियंत्रणात मात्र शेजारील जिल्ह्याने वाढवली चिंता (प्रातिनिधिक फोटो)

सुटकेचा निश्वास सोडण्यासारखी परिस्थिती अद्याप आलेली नाही. कारण लवकरच कोरोना संसर्गाची तिसरी लाटही (Coronavirus Third Wave) येण्याचा अंदाज काही तज्ज्ञांनी वर्तवला आहे

नवी दिल्ली, 06 मे: देशातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने (Corona Second Wave) गंभीर रूप धारण केलेलं असताना ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्स आणि लस अशा सगळ्या आवश्यक घटकांची वानवा आहे. इतकी कठीण परिस्थिती असूनही,का ही ठिकाणी बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या थोडी तरी वाढू लागल्याने येत्या काही दिवसांत लाट ओसरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र तरीही सुटकेचा निश्वास सोडण्यासारखी परिस्थिती अद्याप आलेली नाही. कारण लवकरच कोरोना संसर्गाची तिसरी लाटही (Coronavirus Third Wave) येण्याचा अंदाज काही तज्ज्ञांनी वर्तवला आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याबद्दल अनेक तज्ज्ञांमध्ये एकमत आहे मात्र ती केव्हा येणं अपेक्षित आहे, याबद्दल नेमका अंदाज बांधलेला नाही. केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. विजय राघवन (Pro. Vijay Raghavan) यांनी बुधवारी (5मे) घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती दिली. 'कोरोना संसर्गाची दुसरी लाट संपल्यानंतर तिसरी लाटही येईल; मात्र ती नेमकी कधी येईल, तिचं स्वरूप किती गंभीर असेल, याबद्दल आत्ताच काही सांगता येणारनाही. कोरोना विषाणू सातत्याने आपल्यात बदल करत असल्यामुळे नवनवे म्युटंट व्हेरिएंट (New Variant) येत आहेत. त्यामुळे तिसरी लाट येईल, असं गृहीत धरून आपल्याला तयारीत राहायला हवं. सध्याच्या लशी (Vaccines) प्रभावी आहेतच; मात्र भविष्यातले बदल लक्षात घेऊन शास्त्रज्ञ या लशींमध्येही सुधारणा करण्याचं काम करत आहेत.' हे वाचा-Coronavirus: ग्रामीण भागात कोरोनाचा विस्फोट! अमरावतीमध्ये 110 गावं सील बेंगळुरूमधल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेत डॉ. गिरिधर बाबू संसर्गजन्य रोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. ते नॅशनल कोविड टास्क फोर्सचे कर्नाटकमधील सदस्य आणि सल्लागारही आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल बोलताना ते म्हणाले, 'ही तिसरी लाट थंडीच्या दिवसांत येण्याची शक्यता आहे.नोव्हेंबर महिन्याची अखेर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला ही लाट येऊ शकते. म्हणूनच संसर्गाचा धोका जास्त असलेल्या व्यक्तीने शक्य तितक्या लवकर लसीकरणकरून घेणं आवश्यक आहे.' या लाटेमध्ये तरुणांना जास्त धोका असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. तीन घटकांवर तिसरी लाट येणं अवलंबून असल्याचं बाबू म्हणाले. डिसेंबर महिन्यापर्यंत आपण किती लोकांचं लसीकरण (Vaccination) करू शकतो, सुपरस्प्रेडर (Super Spreader) इव्हेंट्सना आपण किती आणि कसा आळा घालतो आणि विषाणूचे नवे व्हॅरिएंट्स ओळखून त्यांना कसं थांबवू शकतो हे ते तीन घटक. 'दुसऱ्या लाटेचा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवलेला असूनही, अनेक राज्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे आता तरी आपल्याला अशी योजना बनवायला हवी, की आपण पुढच्या अनेक लाटांचं व्यवस्थापन करू शकू. लसीकरणाचं नियोजनही करणं आवश्यक आहे. दुसऱ्या लाटेतून बाहेर पडतानाच कायमस्वरूपी उपाययोजनांकडे आपल्यालापाहायला हवं. त्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करायला हव्यात आणि टेस्टिंगची सुविधाही वाढवायला हवी. कोरोनाबाधितांची आणि मृतांची संख्या कमी होण्यासाठीप्रभावी धोरण आखण्याची गरज आहे,'असंही डॉ. बाबू यांनी स्पष्ट केलं. हे वाचा-'शरीर साथ देईल तोपर्यंत जबाबदारीपासून पळणार नाही', 2 गर्भवती करतायंत रुग्णसेवा केवळ वैद्यकीयच नव्हे, तर वेगवेगळ्या विषयांतले तज्ज्ञ या विषयावर काम करत आहेत. मॅथेमॅटिकल मॉडेलमधले तज्ज्ञ प्रा. एम. विद्यासागर यांनीही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दलचा अंदाज व्यक्त केला. 'संसर्गाचा जास्त धोका असलेल्या व्यक्तींचं लसीकरण येत्या सहा महिन्यांत करण्याची गरज आहे. त्यामुळे तिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकं गंभीर रूप धारण करणार नाही,' एम. विद्यासागर यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे. सात मेच्या आसपास दुसऱ्या लाटेची सर्वोच्च पातळी (Peak of Second Wave) गाठली जाईल,असा अंदाज आहे. प्रा. एम. विद्यासागर यांनी काही दिवसांपूर्वी 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत अशाप्रकारचा व्यक्त केला होता. त्यानंतर नव्या बाधितांच्या संख्येत घट होऊ शकेल. अर्थात, प्रत्येक राज्यात सर्वोच्च पातळी वेगवेगळ्या वेळी गाठली जाईल,असंही सांगण्यात आलं आहे. हे वाचा-कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी ठरणार अधिक घातक; तज्ज्ञांनी सांगितलं कारण सरकारी आकडेवारीनुसार,देशात आतापर्यंत 16.24 कोटी लोकांचं लसीकरण झालं आहे. तसंच, गेल्या 24 तासांत 18 ते 45 या वयोगटातल्या फक्त 2.30 लाख व्यक्तींचंच लसीकरण होऊ शकलं आहे. भारताच्या 11 टक्के लोकसंख्येला लशीचा किमान एक डोस मिळाला आहे. भारताची लोकसंख्या 125 कोटी आहे. त्यामुळे दररोज किमान 40 ते 50 लाख लोकांचं लसीकरण होण्याची गरज आहे. प्रत्यक्षात लशींच्या तुटवड्यामुळे एवढ्या वेगाने लसीकरण होत नाहीये. लसीकरण उत्पादन क्षमतेत जुलैपर्यंत वाढ होईल,असं सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्यानंतर लसीकरण कार्यक्रमाला वेग येईल,अशी अपेक्षा आहे.
First published:

Tags: Corona hotspot, Corona patient, Corona spread, Corona vaccine, Coronavirus

पुढील बातम्या