• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • सावधान! 'कोरोनाची तिसरी लाटही गंभीर, 98 दिवस असेल धोका'

सावधान! 'कोरोनाची तिसरी लाटही गंभीर, 98 दिवस असेल धोका'

कोरोना व्हायरसच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेचा (second covid wave) मोठा तडाखा देशाला बसला आहे. देश अजूनही या लाटेचा सामना करत असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (third covid wave) धोका निर्माण झाला आहे.

 • Share this:
  मुंबई, 3 मे: कोरोना व्हायरसच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेचा (second covid wave) मोठा तडाखा देशाला बसला आहे. देश अजूनही या लाटेचा सामना करत असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (third covid wave) धोका निर्माण झाला आहे. कोरोनाची तिसरी लाट देखील दुसऱ्या लाटेप्रमाणेच धोकादायक असेल, असा इशारा एसबीय इकोरॅप रिपोर्टमध्ये (SBI Ecowrap Report) देण्यात आला आहे. या लाटेचा प्रभाव 98 दिवस असेल, असा अंदाज देखील या रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. रिपोर्टमध्ये काय आहे? आंतरराष्ट्रीय अनुभवाच्या आधारावर एसबीआय इकोरॅपनं हा रिपोर्ट तयार केला आहे. 'कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव हा दुसऱ्या लाटेसारखा असेल. जगातील प्रमुख देशांमध्ये तिसरी लाटेचा प्रवाह 98 दिवस होता. तर दुसऱ्या लाटेचा प्रवाह हा 108 दिवस होता. या लाटेचा सामना करण्यासाठी जय्यत तयारी करणे आवश्यक असून या तयारीच्या जोरावर मृत्यूदराचे प्रमाण कमी करणे शक्य आहे,' असे या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून धडा घेत केंद्र आणि राज्य सरकारने तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी सुरु केली आहे. त्या पार्श्वभूमीवर या रिपोर्टमधील निष्कर्ष महत्त्वाचे मानले जात आहेत. या रिपोर्टनुसार, 'तिसऱ्या लाटेतील गंभीर रुग्णांचे प्रमाण 5 टक्क्यांपर्यंत आणि एकूण मृत्यूचे प्रमाण 40 हजारार्यंत कमी करणे शक्य आहे. दुसऱ्या लाटेत हे प्रमाण 20 टक्के होते. यामध्ये आत्तापर्यंत 1.7 लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वात जास्त फटका भारताला बसला आहे. मात्र आता याची तीव्रता कमी होत आहे. तिसऱ्या लाटेमध्ये मृत्यूदर कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण आणि उत्तम आरोग्य सुविधा आवश्यक आहेत.' Mucormycosis हा Black Fungus मुळे नव्हे; तज्ज्ञांनी सांगितलं आजारामागील नेमकं कारण देशात बुधवारी कोरोना व्हायरसचे 1,32,788 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे देशात कोरोनाची लागण झालेल्या एकूण व्यक्तींची संख्या  2,83,07,832 झाली आहे. या महामारीत आत्तापर्यंत एकूण 3, 35, 102 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: