कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले तरी निश्चिंत राहू नका! निरोगी रुग्णांमध्ये दिसून आली 'ही' लक्षणं

कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले तरी निश्चिंत राहू नका! निरोगी रुग्णांमध्ये दिसून आली 'ही' लक्षणं

रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. बी.एल. शेरवाल यांनी सांगितले की, तुमचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी याचा अर्थ तुम्ही निरोगी आहात असा होत नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचे कोरोना (Coronavirus) रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही त्यांना सोमवारी AIIMS मध्ये दाखल करण्यात आले. सरकारी प्रसिध्दी पत्रकानुसार, गृहमंत्र्यांना गेल्या 3-4 दिवसांपासून थकवा आणि शरीर दुखत असल्याची तक्रार करत होती. अलीकडेच कोव्हिड-19 रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्या रुग्णांमध्येही अशी थकवा आणि शरीर दुखत असल्याची लक्षणं दिसून येत आहेत. त्यामुळे एकदा कोरोनाचे रुग्ण बरा झाला तरी त्यांना पुन्हा आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. हे पाहता गुरुवारपासून दिल्ली सरकारच्या राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पोस्ट कोव्हिड-19 क्लिनिक सुरू होत आहे.

रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. बी.एल. शेरवाल यांनी सांगितले की, तुमचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी याचा अर्थ तुम्ही निरोगी आहात असा होत नाही. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, डॉ. बी.एल. शेरवाल यांनी असे सांगितले की, कोरोनातून जास्त लोक बरे होत आहेत. मात्र निरोगी झालेल्या बऱ्याच रुग्णांना श्वासोच्छवासाच्या तक्रारी आल्या आहेत. आम्हाला यासंदर्भात रूग्णांकडून बरेच फोनही आले आहेत. म्हणूनच पोस्ट कोव्हिड-19 क्लिनिक सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. यामुळे वेगवेगळ्या रूग्णांमधील कोरोनामधून बरे होण्यासाठी कार्यपद्धती किती वेगळी आहे हे समजून घेण्यास मदत होईल.

वाचा-रशियापाठोपाठ आणखी एक देश कोरोना लशीसाठी तयार; कधी येणार बाजारात वाचा

निगेटिव्ह रिपोर्ट आले तरी दिसत आहेत लक्षणं

डॉ.बी.एल. शेरवाल यांनी असेही सांगितले की, 'आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी आल्या आहेत. उदाहरणार्थ, कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णाला श्वासोच्छवासाची समस्या असते. दुसर्‍या रुग्णाला खोकल्याचा त्रास होतो. त्याच वेळी, काही रुग्ण फुफ्फुसाचा आजार झाला. हे रुग्ण वेगवेगळ्या वयोगटातील आहेत. यामध्ये पुरुष आणि स्त्रिया दोघांचा समावेश आहे.

वाचा-Coronavirus ची दहशत : तिरुपती, अयोध्या आणि आता वैष्णोदेवीतही घडला तोच किस्सा

दिल्ली सरकारनं केली अशी सोय

याबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी सांगितले की, अशी प्रकरणं समोर आली आहेत. ज्यात रिपोर्ट निगेटिव्ह येऊन रुग्ण घरी गेला आहे, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बरे झाल्यानंतरही रुग्ण पूर्णपणे निरोगी होत नाहीत. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल खालवते, ज्यामुळे काही प्रकरणांमध्ये रुग्णांचा मृत्यू होतो. म्हणूनच, कोरोनोतून बरे झालेल्या रूग्णांच्या घरी आता ऑक्सिजन कन्स्ट्रक्टर पाठवण्याची तयारी दिल्ली सरकार करीत आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 19, 2020, 9:14 AM IST

ताज्या बातम्या