मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Corona test : आता एका मिनिटात श्वासातून कळणार तुम्ही Covid पॉझिटिव्ह आहात का?

Corona test : आता एका मिनिटात श्वासातून कळणार तुम्ही Covid पॉझिटिव्ह आहात का?

दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलीस ब्रीद अॅनालायझरचा वापर करतात, हे अनेकांनी पाहिलं असेल. आता तशी Covid Test ही करता येणार आहे.

दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलीस ब्रीद अॅनालायझरचा वापर करतात, हे अनेकांनी पाहिलं असेल. आता तशी Covid Test ही करता येणार आहे.

दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलीस ब्रीद अॅनालायझरचा वापर करतात, हे अनेकांनी पाहिलं असेल. आता तशी Covid Test ही करता येणार आहे.

सिंगापूर, 30 ऑक्टोबर : दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलीस ब्रीद अॅनालायझरचा वापर करतात, हे अनेकांनी पाहिलं असेल. तोंडात एक मोठ्या नळीसारखं मशीन घालून शरीरात अल्कोहोलचं प्रमाण किती आहे हे समजू शकतं, अगदी त्याच धर्तीवर आता शरीरात Coronavirus आहे की नाही हे श्वासातून कळणार आहे. त्यासाठी सिंगापूरच्या Breathonix नावाच्या एका स्टार्टअपने Breathalyser test विकसित केली आहे. एका मिनिटात फक्त श्वासातून होणारी ही अशी पहिलीच कोरोना चाचणी (Covid test)आहे.

आतापर्यंत कोरोना चाचण्यांचे अनेक प्रकार प्रत्यक्षात आले आहेत. बहुतेक वेळेला कोरोना विषाणू शरीरात आहे की नाही हे तपासण्यासाठी स्वॅब टेस्ट ही जगात सगळीकडे मान्य आहे. स्वॅब म्हणजे नाकातून किंवा घशातून द्राव घेऊन त्याची लॅब टेस्ट करतात. त्यातून covid-19 आहे की नाही हे कळू शकतं. त्याहून लवकर होणारी पण अचूकतेत कमी असलेली अँटिजेन टेस्टसुद्धा प्रचलित आहे. यामध्ये शरीरात कोरोनाविरोधात लढणाऱ्या अँटिबॉडीज आहेत की नाही, हे तपासलं जातं. रक्त तपासणीतून अँटीबॉटी टेस्ट करून कोरोनाचा विषाणू आहे की नाही याचा अंदाज बांधता येतो. ही सर्वाधिक वेगवान चाचणी मानली जाते. पण या रक्त तपासणीपेक्षाही फक्त श्वासातून एका मिनिटाच्या आत कोरोनाची चाणणी करण्याचा दावा सिंगापूरच्या एका कंपनीने केला आहे.

ब्रीद अनालयाझर टेस्ट करून कोरोना विषाणू शोधण्याचा त्यांचा दावा आहे. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरच्या Breathonix नावाच्या स्टार्ट अपने या नव्या चाचणीचा शोध लावला आहे. या चाचणीचा निष्कर्ष 90 टक्के अचूक असतो, असं त्यांनी केलेल्या ट्रायल्समध्ये दिसून आलं. त्यांनी 180 लोकांवर ही चाचणी केली. त्यांची नेहमीच्या पद्धतीने पुन्हा एकदा कोरोना चाचणी केली असला, breathalyser test चे निष्कर्ष या चाचणीशी जुळणारे ठरले.

आता या उपकरणाची चाचणी सिंगापूर बाहेरही करण्यात येत आहे. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला ही चाचणी प्रत्यक्षात व्यावसायिक तत्त्वावर सुरू करता येईल, अशी चिन्हं आहेत.

First published:

Tags: Coronavirus, Covid19