Home /News /coronavirus-latest-news /

10 राज्यांमध्ये सर्वाधिक कोरोनाचा धोका! वाचा गेल्या 24 तासांतील नवीन आकडेवारी

10 राज्यांमध्ये सर्वाधिक कोरोनाचा धोका! वाचा गेल्या 24 तासांतील नवीन आकडेवारी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 8 राज्यांमध्ये 48 टक्के रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.

    मुंबई, 07 ऑक्टोबर : सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला नव्यानं कोरोना होणाऱ्या लोकांची संख्या कमी आली आहे. दिवसाला 90 हजाराच्या आसपास कोरोनाचे नवीन रुग्ण मिळत होते ते आता 70 ते 75 च्या आसपास आल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 24 तासांत देशात 72,049 हजार नवीन लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 986 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 67 लाख पार झाला असून आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी 1 लाख 4 हजार 555 लाखांवर पोहोचली आहे. मंगळवारी 81 हजार 945 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर देशात 9 लाख 7 हजार 883 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. हे वाचा-... म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट Facebook ने केली 8 राज्यांच्या 25 जिल्ह्यांमध्ये 48% रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 8 राज्यांमध्ये 48 टक्के रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 15 जिल्हे, कर्नाटक पश्चिम बंगाल गुजरात प्रत्येकी दोन जिल्हे, पंजाब, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेशातील प्रत्येकी एका जिल्ह्याचा समावेश आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू यासह 10 राज्ये अशी आहेत जिथे कोरोनाचे 77 टक्के रुग्ण आढळून आले आहेत. हे वाचा-ऑक्टोबरमध्ये आली GOOD NEWS! 7 दिवसात पॉझिटिव्हिटी रेट घटला महाराष्ट्राची काय स्थिती? महाराष्ट्रात coronavirus चे hot spots ठरलेल्या मुंबई, पुणे, नागपूर जिल्ह्यातली नवीन रुग्णसंख्या सातत्याने खाली येत असल्याने दिलासादायक चित्र दिसत आहे. पण मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या दैनंदिन Covid-19 आकडेवारीवरून काही जिल्ह्यांमध्ये मात्र कोरोनाचा धोका वाढताना दिसतो. विशेषतः ग्रामीण भागात या विषाणूने हातपाय पसरायला सुरुवात केली असल्याचं दिसतं. 6 ऑक्टोबरला राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकड्यांनुसार, राज्यात 2,47,023 कोरोना रुग्ण उपचाराधीन (Active patients)आहेत. गेल्या 24 तासांत 12,258 नवे रुग्ण राज्यात सापडले, तर 370 जणांचं Covid मुळे निधन झालं.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Symptoms of coronavirus

    पुढील बातम्या