मॅड्रिड, 30 ऑक्टोबर : हिवाळ्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. फ्रान्समध्ये देखील लॉकडाऊनच्या नव्या गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. इतकच नाही तर अमेरिका, ब्रिटनसोबत आता आणखीन एका देशात कोरोनाचा धोका सर्वाधिक वाढल्यानं खळबळ उडाली आहे.
हिवाळा सुरू होताच स्पेनमधील जीवघेण्या कोरोना विषाणूचा कहर पुन्हा एकदा सुरू झाला. त्या दृष्टीने सहा महिन्यांपासून देशात आरोग्य आणीबाणी लागू करण्यात आली आहे. कोरोनाची पहिली लाट इतकी भयंकर होती की त्यामुळे स्पेनमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. आतापर्यंत देशात 35 हजारहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
वर्ल्डोमीटरनं दिलेल्या माहितीनुसार स्पेन कोरोनाच्या यादीत सहाव्या तर फ्रान्स पाचव्या क्रमांकावर आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत 12 लाख 38 हजार 922 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 35 हजार 639 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात अजूनही 2,404 लोकांची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
हे वाचा-लॉकडाऊनमध्ये नैराश्यच नाही तर वजन वाढण्याचा धोका जास्त, संशोधनातून माहिती समोर
दुसरीकडे फ्रान्समध्ये देखील कोरोनाचा संसर्ग वेगानं पसरत असल्यानं शुक्रवारपासून लॉकडाऊनच्या नवीन गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवा आणि काही महत्त्वाचे घटक वगळा व्यवसाय आणि इतर दुकानं बंद राहणार आहेत. तर भारतात सध्या रिकव्हरी रेट चांगला असला तरीदेखील दर दिवसाला साधारण 50 हजाराच्या आसपास कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत आहेत.
With 48,648 new #COVID19 infections, India's total cases surge to 80,88,851. With 563 new deaths, toll mounts to 1,21,090.
Total active cases are 5,94,386 after a decrease of 9301 in last 24 hrs.
Total cured cases are 73,73,375 with 57,386 new discharges in last 24 hrs. pic.twitter.com/BhmWaxSyCJ
— ANI (@ANI) October 30, 2020
भारतात गेल्या 24 तासांत 48,648 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 563 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 5,94,386 रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून 57,386 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत भारतात 73,73,375 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.