स्नेहा मोरदानी
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : भारतात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाची साथ पसरली आहे. भारतात दररोज हजारो रुग्णांचा मृत्यू होत असून जवळपास लाखभर रुग्ण रोज सापडत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने देखील याबद्दल इशारा दिला असून भारतात दररोज वाढणाऱ्या रुग्णांमुळे चिंता वाढत आहे. मात्र दिल्ली, मुंबईसारख्या शहरांमध्ये एकदा कमी होते असं वाटत असताना पुन्हा एकदा साथीने उफाळून डोकं वर काढलं आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्यामुळे ही दुसरी लाट असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. म्हणजे पहिली लाट येऊन गेली का? पहिली लाट कधी संपली? दुसरी लाट खरोखरच आली आहे का आणि ती किती टिकणार याविषयी तज्ज्ञांशी बोलून समोर आलेली माहिती..
देशातील काही भागात करोना संसर्गाची दुसरी लाट आहे, असं Covid-19 राष्ट्रीय टास्क फोर्सचे सदस्य आणि दिल्लीच्या AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सीएनएन-न्यूज 18 शी बोलताना सांगितलं. डॉ. गुलिरिया एक आघाडीचे फुफ्फुसशास्त्रज्ञसुद्धा आहेत.
कोरोनाची लाट म्हणजे नेमकं काय हेच अद्याप स्पष्ट झालेलं नाही. एका व्याख्येनुसार लाट म्हणजे आजारी व्यक्तींची निश्चित वाढती संख्या आणि त्यानंतर हळूहळू संख्येत झालेली घट. मग भारतात असं झालं का? तर काही ठिकाणी असे झालं. संपूर्ण देशभरात Coronavirus ने एकसारखं वर्तन केलेलं नाही. काही शहरांमध्ये ही साथ फोफावली आहे, तर काही भागात अद्याप तेवढा धोका निर्माण झालेला नाही. डॉ. गुलेरिया यांनी भारतात दुसरी लाट म्हणजे काय हे सांगायचा प्रयत्न केला. “काही भागात कोविड -19 च्या धोक्यामुळे लादलेल्या बंधनांना लोक कंटाळले. मृत्यूदर कमी आहे, त्यामुळे थोडी भीती कमी झाली आणि दिल्लीसारख्या शहरात सगळी बंधनं, नियम झुगारून लोक आता मास्कशिवाय फिरत आहेत. गर्दी करताना दिसत आहेत. लोकांच्या अशा निष्काळजीपणामुळे येत्या काळात करोना रुग्णाच्या संख्येत वाढ होईल", असंही गुलेरीया म्हणाले.
याबाबत अधिक बोलताना डॉ. गुलेरिया म्हणाले की, "येत्या काही महिन्यांमध्ये रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. जरी आपण हे वाढते आकडे पाहणार असलो तरी, प्रति दहा लाख प्रकरणांमध्ये रुग्णसंख्या इतर देशांच्या मानाने कमीच होत जाईल."
जूनमध्ये, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन (Saumya Swaminathan) यांनी म्हटलं होतं की,"करोनाचा संसर्ग सध्या सामूदायिक असून विषाणू अजूनही अस्तित्वात असल्याने संसर्गाची दुसरी लाट येणं अतिशय धोकादायक आहे. आपल्याला अजून हेच माहीत नाही की ही दुसरी लाट आहे की, पहिलीच लाट अद्याप अजून काही देशांमध्ये संपलेली नाही."
भारतात लाट नाहीच
भारताने कोरोनाव्हायरसची साथ आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला, असा दावा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) महासंचालक प्राध्यापक बलराम भार्गव यांनी केला आहे. "अमेरिका आणि युरोप खडातील देशांमध्ये करोनाची सर्वोच्च लाट आली. त्यानंतर ती लाट कमी झाली. आणि त्यानंतर तिथे करोनाची दुसरी लाट आली. आम्ही त्यातून खूप काही शिकलो. आम्ही करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अशी कामाची आखणी केली की कोरोनामुळे जास्त लोक मरणार नाहीत. वेळेत प्रभावी लॉकडाउन केल्यामुळेच हे शक्य झाले. त्यामुळे आपल्या देशात करोनाची सर्वोच्च लाट आलेलीच नाही", असं भार्गव यांनी News18 शी बोलताना सांगितलं.
साथीच्या रोगाच्या सुरुवातीला आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनीसुद्धा असा दावा केला होता की, "भारतात करोनाची सर्वोच्च लाट कधीच येणार नाही."
Covid-19 च्या आलेखाने असं सूचित केलं आहे की, एखाद्या विषाणूच्या अपेक्षेप्रमाणे या प्रकरणांमध्ये तांत्रिकदृष्ट्या वाढ झालेली नाही. या प्रकरणात अंदाज अगदी उत्तम राहिले आहेत. भारत हा विस्ताराने मोठा देश आहे. ज्यामध्ये अनेक राज्यांचा समावेश आहे. यापैकी बर्याच राज्यांमध्ये करोनाची साथ वेगवेगळ्या वेगवेगळ्या टप्प्यांवर दिसून आली. त्यामुळे करोनाची साथ भारतात बर्याच काळापासून हळू आणि स्थिरपणे वाढलेली दिसून येते. कारण सध्याच्या घडीला काही राज्यांमध्ये साथ वाढते किंवा कमी होते. काही नवीन प्रकरणांमध्ये अजूनही साथ वेगाने वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण देशामध्ये करोनाची साथ वाढत आहे हे असं म्हणणं योग्य नाही", असं आरोग्य अर्थशास्त्रज्ञ रिजो एम जॉन यांनी म्हटलं आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार करोनाची साथ वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी मोठया प्रमाणावर पसरलेली आहे. त्यामुळे आपण हे म्हणू शकत नाही की, करोनाची साथ मोठ्या प्रमाणावर पसरत आहे, असा सरकारचा दावा आहे. करोनाची साथ वाढत नाही असं म्हणणं म्हणजे रुग्णसंख्या वाढत नाही असं म्हणण्यासारखं आहे. महाराष्ट्रात जुलै ते सप्टेंबर दरम्यान दैनंदिन रुग्णसंख्या 6,000 वरून 24,000 पर्यत वाढली. कर्नाटकात काही प्रमाणात स्थिर झाली आहे. उत्तर प्रदेशात 829 पासून 6,477 पर्यत वाढ झाली आहे. तमिळनाडूमध्ये घट होण्याची प्राथमिक चिन्हं आहेत, असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं.
“मुंबई व दिल्लीसारख्या शहरांमध्ये पहिली लाट जास्त प्रमाणात पसरली नाही. आधाररेषेला स्पर्श न करता किंवा कमीतकमी कमी स्पर्श केल्याशिवाय, आम्ही दुसरी लाट असल्याचं तांत्रिकदृष्ट्या सांगू शकत नाही. माझ्या मते, ही पहिलीच लाट अजून सुरू आहे", असे कोविड -19 विरोधी राष्ट्रीय कार्यदलाचे सदस्य आणि रोग विशेषज्ञ डॉ. गिरीधर बाबू यांनी म्हटलं आहे.
"प्रत्येक राज्यातील प्रांतांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी करोनाचा सेसर्ग वेगवेगळेया वेळी वाढत आहे. हे एखाद्या प्रदेशातील संक्रमणाच्या अस्तित्वातील फरक, लोकसंख्येची हालचाल आणि मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन इत्यादी गोष्टींवर अवलंबून आहे. म्हणूनच भारताची एकूण रुग्ण संख्येचा बिंदू काही काळासाठी कमी किंवा जास्त होऊ शकतो, असेही डॉ. गिरीधर बाबू यांनी सांगितले.
भारतात दररोज 90,000 करोना रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णसंख्या वाढत आहे. आणि त्याचप्रमाणे दैनंदिन मृत्यू 15 दिवसांपासून 1000 च्या आसपास होत आहेत. दिल्लीसारख्या शहरांमध्येही नवीन प्रकरणे नोंदविताना किरकोळ घट दिसत आहे. परंतु रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण किंवा रुग्णसंख्येत लक्षणीय घट झालेली नाही. त्या दृष्टीने, सरकारी विभागातून दुसर्या लाटेचा दावा आणि पुढच्या दिवसांत काय करोनाबात काय अपेक्षा करावी लागेल, या विषयाला कारणीभूत ठरणार आहे.
कोविड – 19 च्या साथीच्या रोगाची तुलना बर्याचदा 1918 च्या H1N1 1 इन्फ्लूएंझा किंवा स्वाइन फ्लू रोगाच्या साथीबरोबर केली जाते. या रोगामध्ये एका वर्षात कमीतकमी तीन लाटा येतात. त्या दृष्टीने covid-19 ची साथ खूप वेगळी आहे.