जिद्द आणि युद्ध जिंकलं! कोरोनावर मात करणाऱ्या 98 वर्षांच्या जवानाला नौदल अधिकाऱ्यांनी असा दिला निरोप

जिद्द आणि युद्ध जिंकलं! कोरोनावर मात करणाऱ्या 98 वर्षांच्या जवानाला नौदल अधिकाऱ्यांनी असा दिला निरोप

अत्यंत गंभीर अवस्थेतून सकपाळ यांनी जिद्दीच्या जोरावर हे युद्ध जिंकल्यानं त्यांचं खूप कौतुक होत आहे.

  • Share this:

नेरुळ, 16 जुलै: देशात कोरोनाचं थैमान सुरू असलं तरीही जिद्दीनं त्यावर मात करून त्यातून बरे होणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. 98 वर्षांच्या सेवानिवृत्त जवान रामू लक्ष्मण सकपाळ यांनी कोरोनाविरुद्धचं युद्ध जिंकलं आहे. नौदलातील अधिकारी आणि शिपायांनी त्यांचं रुग्णालयातून बाहेर पडताना जोशात स्वागत केलं.

काही दिवसांपूर्वी सकपाळ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांच्यावर नेरुळमधील नौदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती खालवल्यानं त्यांना मुंबईच्या आयएनएचएस अश्विनी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. 98 वर्षीय सकपाळ यांना काही आठवड्यांपूर्वी कोरोना विषाणूची लागण झाली होती. यामुळे त्याला निमोनिया देखील झाला. भारतीय नौदलाने याबाबत माहिती दिली.

हे वाचा-ऑगस्ट महिन्यात सर्वात जास्त वाढली कोरोनाची भीती, वाचा कसा आहे ग्राफ

सकपाळ हे भारतीय सैन्यदलातील महार रेजिमेंटमधी सेवानिवृत्त शिपाई आहेत. त्यांची नौदलातील अधिकाऱ्यांनी योग्य रितीनं काळजी घेतली. त्यामुळे कोरोनाविरुद्ध मात करणं अधिक सोपं झाल्याचं सांगितलं. अत्यंत गंभीर अवस्थेतून सकपाळ यांनी जिद्दीच्या जोरावर हे युद्ध जिंकल्यानं त्यांचं खूप कौतुक होत आहे. रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांना टाळ्यांनी आणि फुलांचा पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला आहे. त्यांच्या जिद्दीमुळे कोरोनावर यशस्वीपणे मात करू शकले असंही नौदलानं सांगितलं आहे. INHS अश्विनी हे नौदल, हवाई दल, सैन्य दलातील जवानांसाठी कार्य करत आहे.

कोरोनाची लागण झालेल्या जवानांवर सध्या INHS अश्विनी इथे उपचार सुरू आहेत. इथले अधिकारी आणि जवान यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत असल्याचंही नौदलाकडून सांगण्यात आलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 16, 2020, 12:00 PM IST

ताज्या बातम्या