हो! Coronavirus ने आपल्या मानसिकतेवरही परिणाम केला आहे; हा घ्या पुरावा

हो! Coronavirus ने आपल्या मानसिकतेवरही परिणाम केला आहे; हा घ्या पुरावा

Coronavirus ने आपलं आयुष्य खरंच किती बदललं आहे, काय सुरू आहे लोकांच्या मनात हे शोधण्यासाठी Network18 ने एक सर्व्हे केला. 50 हजार लोकांच्या प्रतिक्रिया काय सांगतात वाचा..

  • Share this:

 मुंबई, 29 मे : Coronavirus  ने आपल्या आरोग्यावर, जगण्यावर, फिरण्यावर, कामावरच नाही तर मनावर किती खोल परिणाम केलाय हे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून अधोरेखित झालं.

Coronavirus ने आपलं आयुष्य खरंच किती बदललं आहे आणि भविष्यात आपल्या राहणीमानात, वागण्यात, विचार करण्यातही बदल होईल का, काय सुरू आहे लोकांच्या मनात हे शोधण्यासाठी Network18 ने एक सर्व्हे केला.

लॉकडाऊन उठल्यावर लगेच ट्रेन पकडून ऑफिसला किंवा गावाला किंवा फिरायला जावं असं किती लोकांना वाटतं? जवळपास 80 टक्के मराठी लोकांना आता ट्रेन किंवा फ्लाइटने प्रवास करायची भीती वाटते आहे. पुढचं वर्षभर किमान सुट्टीसाठी प्रवास करायचा नाही, सिनेमाला जायचं नाही, पार्टी करायची नाही, अगदी शेकहँड करतानाही विचार करणार असं बहुतांश लोक म्हणत आहेत.

नेटवर्क18 च्या lokmat.news18.com सह 13 भाषांच्या डिजिटल आणि सोशल मीडियाच्या व्यासपीठावरून एक प्रश्नावली प्रसारित करण्यात आली होती. याशिवाय News18, मनी कंट्रोल, फर्स्टपोस्ट, CNBC-TV18 यांच्या सोशल मीडियावर शेअर झालेल्या या प्रश्नावलीला मिळालेल्या प्रतिसादावरून, त्यावर आलेल्या एकूण 50 हजार उत्तरांवरून निष्कर्ष काढण्यात आले  आहेत.

ट्रेन किंवा विमानाने प्रवास करायला 79 % मराठी लोकांनी नाही असं उत्तर दिलं आहे. सिनेमा थिएटरमध्ये जाल का या प्रश्नाचंही 78 टक्के मराठी वाचकांनी नाही असं दिलं आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू होईल तेव्हा ती वापराल का, या प्रश्नाला 68 टक्के लोकांनी स्वतःची गाडी वापरायला प्राधान्य देऊ असं उत्तर दिलंय. फक्त 14 टक्के मराठी वाचक पब्लिक ट्रान्स्पोर्टने जाऊ असं सांगतात तर 16  टक्के सांगू शकत नाही, असं उत्तर देतात.

लॉकडाऊनमध्ये जास्त सूट दिल्यास वैज्ञानिकांनी व्यक्त केली भीती

इथून पुढे कुणाशी हस्तांदोलन कराल का, निःशंक मनाने शेकहँड कराल का या प्रश्नावर फक्त 3 टक्के मराठी लोकांनी हो असं म्हटलं आहे. 79 टक्के लोकांनी नक्कीच शेकहँड करणार नाही, असं म्हटलंय. बहुतेक सर्वच भाषिक वाचकांनी शेकहँड करू शकणार नाही, असं म्हटलं आहे. या प्रश्नावर पंजाबी वाचकांना सर्वात जास्त शंका दिसते. शेकहँड करू की नाही, सांगता येत नाही असं 98 टक्के पंजाबी लोकांनी उत्तर दिलं आहे.

संधी मिळाली तर कुठल्या प्रकारचे कोविड योद्धे व्हाल या प्रश्नावर डॉक्टर, नर्स यांच्यानंतर पोलीस व्हायला पसंती मिळाली आहे. स्वच्छतेच्या कामांसाठी सर्वात कमी लोकांची तयारी आहे.

घरकाम करायला यापुढेही वेळ द्याल का, याचंही उत्तर बहुतेकांनी सकारात्मक दिलं आहे.

गुजराती लोक सोडले तर बहुतेकांनी स्वतःचा स्वयंपाक स्वतःच करण्याला प्राधान्य दिलं आहे. 49 टक्के गुजरात्यांची बाहेर जेवायला जायला किंवा बाहेरून मागवायची तयारी आहे. बाहेरून जेवण मागवायची तयारी अजूनही फक्त 22 टक्के मराठी लोकांनी तयारी दर्शवली आहे. तेही थेट संपर्क होणार नाही अशी डिलिव्हरी सिस्टीम असेल तर. 65 टक्के मराठी लोकांनी घरातच स्वयंपाक करणार असं सांगितलं आहे. 14 टक्के लोकांनी आता बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाणं शक्य नाही असं सांगितलं.

अन्य बातम्या

कोरोनाच्या दहशतीनंतर पुणेकरांसाठी चांगली बातमी, तुळशीबाग मार्केट होणार खुलं

मोठा दिलासा! बरे झालेल्या रुग्णांचा विक्रमी उच्चांक, एकाच दिवशी 8381 डिस्चार्ज

भारत-चीन वादाचा फायदा घेण्याचा पाकिस्तानचा कट, दहशतवाद्यांना शस्त्रांचा पुरवठा

First published: May 29, 2020, 8:59 PM IST

ताज्या बातम्या