Home /News /coronavirus-latest-news /

...तर भारतात दररोज सापडणार 2.87 लाख नवे COVID-19 रुग्ण, वाचा धक्कादायक रिपोर्ट

...तर भारतात दररोज सापडणार 2.87 लाख नवे COVID-19 रुग्ण, वाचा धक्कादायक रिपोर्ट

2021 मार्च-मे पर्यंत जगात 20 ते 60 कोटी रुग्ण आणि 17.5 लाख नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो असा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.

    न्यूयॉक 8 जुलै: कोरोना व्हायरसवर जगभर संशोधन सुरू आहे. अनेक औषधांच्या मानवी चाचण्यांनाही सुरुवात झाली आहे. पण जर यावर लवकरच औषध सापडलं नाही तर भारतात भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते. फेब्रुवारी 2021 पासून भारतात दररोज 2.87 लाखांच्या जवळपास नवे रुग्ण आढळून येऊ शकतात असा रिपोर्ट जगविख्यात MIT (Massachusetts Institute of Technology)ने दिला आहे. जगभरातल्या 84 देशांच्या टेस्टिंग आणि कोरोना रुग्णांचा अभ्यास करून MITच्या तज्ज्ञांनी हा रिपोर्ट तयार केला आहे. या रिपोर्टनुसार फेब्रुवारी 2021पासून भारतात दररोज तीन लाखांच्या जवळपास रुग्ण येऊ शकतात. असं झालं तर ते फार मोठं संकट असेल आणि जगात भारत सर्वाधिक रुग्णांचा देश बनेल असंह या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. याच काळात अमेरिकेत दररोज 95,400, दक्षिण अफ्रीकेत 20,600, इराणमध्ये 17,000, इंडोनेशियात 13,200, ब्रिटनमध्ये 4200, नाइजेरियात 4000, तुर्कीमध्ये 4,000, फ्रांसमध्ये 3300 आणि जर्मनीत 3000 रुग्ण आढळून येऊ शकतात असंही या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. SEIR (Susceptible, Exposed, Infectious, Recovered) या मॉडेलच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या काळ्या कामांसाठीही COVID-19 स्‍पेशल ट्रेनचा वापर, बॉक्स पाहून बसला धक्का 2021 मार्च-मे पर्यंत जगात 20 ते 60 कोटी रुग्ण आणि 17.5 लाख नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो असा दावाही या अहवालात करण्यात आला आहे. हा अंदाज असून तो पूर्णपणे खरा होईलच असा नाही तर त्यावरून परिस्थिती भीषण आहे हे स्पष्ट होतं असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे. दरम्यान, आतापर्यंत कोरोनाव्हायरस (coronavirus) हा संक्रमित व्यक्ती शिंकल्यानंतर, खोकल्यानंतर त्याच्या तोंडातून निघणाऱ्या थेंबाशी इतर व्यक्तींचा संपर्क तर पसरतो, हे सर्वांना ठावूक आहे. मात्र आता कोरोना एका संशोधनानुसार कोरोनाव्हायरस हा हवेतूनही (airborne coronavirus) पसरू शकतो, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता चिंता अधिक वाढली आहे. मात्र शास्त्रज्ञांनी आता यावरही हे मार्ग काढला आहे. Coronavirus हवेतून पसरू शकतो? अखेर WHO नेही घेतली पुराव्यांची दखल शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, एक असा एअर फिल्टर (Novel air filter) तयार करण्यात आला आहे जो हवेतील विषाणूला मारण्यास सक्षम असेल. शास्त्रज्ञांना तयार केलेला हा फिल्टर शाळा, रुग्णालये आणि विमानांसारख्या बंद ठिकाणी कोरोनाचा फैलाव रोखू शकतो.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या