मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कुणामार्फत पसरला कोरोनाव्हायरस? जागतिक आरोग्य संघटनेनं दिलं उत्तर

कुणामार्फत पसरला कोरोनाव्हायरस? जागतिक आरोग्य संघटनेनं दिलं उत्तर

Coronavirus हा कोणत्या लॅबमधून नाही तर प्राण्यामार्फत पसरला असावा, असं WHO नं म्हटलं आहे.

Coronavirus हा कोणत्या लॅबमधून नाही तर प्राण्यामार्फत पसरला असावा, असं WHO नं म्हटलं आहे.

Coronavirus हा कोणत्या लॅबमधून नाही तर प्राण्यामार्फत पसरला असावा, असं WHO नं म्हटलं आहे.

जिनिव्हा, 21 एप्रिल : जगभरात कोरोनाव्हायरस (Coronavirus) नेमका आला तरी कुठून, असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. सुरुवातीला साप, त्यानंतर वटवाघूळ (bats) आणि आता लॅबमधूनच (lab) हा व्हायरस पसरवण्यात आला असं म्हटलं जातं आहे.  मात्र हा व्हायरस लॅबमधून नव्हे तर एखादा प्राणी विशेषत: वटवाघळामार्फत पसरला असावा, असं जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organisation) म्हटलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं लॅबमधून कोरोनाव्हायरस पसरला असण्याची शक्यता नाकारली आहे. सध्या जे पुरावे उपलब्ध आहेत, त्यानुसार कोरोनाव्हायरस हा प्राण्यापासून पसरला असं दिसून येतं आहे. कोरोनाव्हायरस हा कोणत्या लॅबमध्ये तयार करण्यात आलेला नाही, असंही WHO नं म्हटलं आहे.

हे वाचा - कोरोनाव्हायरसपासून बचाव करता करता तुम्हाला केबिन फिव्हर तर झाला नाही ना?

डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार जागतिक आरोग्य संघटनेच्या वेस्टर्न पॅसिफिकचे क्षेत्रीय संचालक तकेशी केसाई यांनी सांगितलं की, "कोरोनाव्हायरस नेमका कुणामार्फत पसरला, हे ठोस सांगता येईल अशी माहिती सध्या तरी मिळणं शक्य नाही.  मात्र हा प्राण्यामार्फत माणसांमध्ये आल्याची शक्यता आहे"

कोरोनाव्हायरस हा चीनमधील वुहानमध्ये असलेल्या लॅबमधून पसरला की नाही, याचा तपास करण्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचा - ...तर कोरोनामुळे परिस्थिती आणखी वाईट होईल, WHOने दिला साऱ्या जगाला इशारा

दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेनं याआधी वटवाघळापासून कोरोनाव्हायरस पसरल्याची शक्यता व्यक्त केली होती. मानवी शरीरातील कोरोनाव्हायरसची जेनेटिक चाचणी केल्यानंतर ते वटवाघळांमधील कोरोनाव्हायरसशी मिळतेजुळते असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे सुरुवातीला हा व्हायरस प्राण्यांमध्ये आणि त्यानंतर माणसांमध्ये पसरला असावा, असं म्हणू शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेनं असंही म्हटलं होतं की, सीफूड मार्केटमध्ये सर्वात आधी एका व्यक्तीला कोरोनाव्हायरसची लागण झाली आणि त्यानंतर हा व्हायरस इतर माणसांमध्ये पसरला.

संकलन, संपादन - प्रिया लाड

हे वाचा - सावधान! Lockdown नंतर ही काळजी घेतली नाही तर होऊ शकतो कोरोनाचा उद्रेक

First published:

Tags: Coronavirus