मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /नव्या Corona अवतारांनी चिंता वाढली; कोरोनाचे आणखी 2 व्हेरियंट सापडले!

नव्या Corona अवतारांनी चिंता वाढली; कोरोनाचे आणखी 2 व्हेरियंट सापडले!

कोरोना विषाणूचे दोन नवीन व्हेरीयंट सापडल्याने खळबळ उडाली आहे. आधीच Covid19 ने जनता हैराण असताना आता विषाणू आणखी रूप बदलत असल्याने तज्ज्ञांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

कोरोना विषाणूचे दोन नवीन व्हेरीयंट सापडल्याने खळबळ उडाली आहे. आधीच Covid19 ने जनता हैराण असताना आता विषाणू आणखी रूप बदलत असल्याने तज्ज्ञांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

कोरोना विषाणूचे दोन नवीन व्हेरीयंट सापडल्याने खळबळ उडाली आहे. आधीच Covid19 ने जनता हैराण असताना आता विषाणू आणखी रूप बदलत असल्याने तज्ज्ञांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

दिल्ली, 2 सप्टेंबर : कोरोना विषाणूचे (Coronavirus) दोन नवीन व्हेरीयंट (New Variant of corona) सापडल्याने खळबळ उडाली आहे. आधीच कोविड19 ने जनता हैराण असताना आता विषाणू आणखी रुप बदलत असल्याने तज्ञांनी गंभीर चिंता ( covid-19 Serious concern by experts) व्यक्त केली आहे. याआधी कोलंबियात B.1.621 हा व्हेरीयंट सापडला होता. त्यानंतर आफ्रिकेत (South Africa) दुसरा व्हेरीयंट सापडला. परंतु आता या नव्या व्हेरीयंटची लक्षणं अधिक घातक परिणाम करणारी आहेत, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील (Medical Field) जाणकारांनी चिंता व्यक्त केली आहे.

दोन्ही व्हेरीयंट महत्त्वाचे का?

कोलंबियात सापडलेल्या व्हेरीयंटचे नामकरण हे ग्रिक अक्षरांच्या आधारावर केले गेले होते. या व्हेरीयंटला संयुक्त राष्ट्रसंघाच्या आरोग्य संस्थेने 30 ऑगस्टला व्हेरीयंट ऑफ इंटरेस्ट (VOI) च्या सुचीत टाकले होते. यात म्यूटेशनचे काही गुण आहेत जे इम्यूनला सुरक्षित ठेवतात. आता याचा अर्थ असा आहे की या व्हेरीयंटमध्ये लसीतून किंवा अँटीबॉडीजमधून तयार झालेल्या रोगप्रतिकारशक्तीला भेदण्याची क्षमता आहे. शिवाय हा युक्तिवादाला अंतिम रुप देण्यासाठी अजून संशोधनाची गरज आहे, असं काही तज्ञांचं म्हणणं आहे. अँटीबॉडीजला धोका पोहचवण्यात या व्हेरीयंटमध्ये अधिक क्षमता आहे. असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.

ही व्हेरीयंट कुठे सापडली?

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जारी केलेल्या एका अहवालात या व्हेरीयंटचे 4500 हजार नमुने घेण्यात आले आहे. जे जगभरातील सर्व देशांमधून घेतलेले आहेत. आणि विशेष म्हणजे या व्हेरीयंटचा पसरण्याचा वेग हा 0.1 टक्के एवढाच आहे. परंतु याचे प्रमाण कोलंबियात 39 टक्के तर इक्वाडोरमध्ये 13 टक्के आहे.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा व्हेरीयंट 7 लोकांना झाला होता. त्या सातही लोकांचे लसीकरण झालेले होते. या नव्या व्हेरीयंटची बाधा झालेले नागरिक आधीच वेगवेगळ्या कारणांनी आजारी पडलेले होते, असं काही जाणकारांचं मत आहे. दक्षिण आफ्रिकेतील संशोधकांचा दावा आहे की C.1.2 हा व्हेरीयंट मे आणि ऑगस्टमध्ये जवळपास सर्वच देशांमध्ये आढळून आला होता. परंतु त्याचा संक्रमण दर कमी होता. ऑनलाइन व्हेरीयंट ट्रँकरनुसार भारतात या व्हेरीयंटचा एकही रुग्ण सापडलेला नाही.

Corona च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका, पुणे मनपाने दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

नव्या व्हेरीयंटवर लस परिणामकारक?

नव्या व्हेरीयंटला VOI चे लेबल लागलेले आहे. ज्या आजारामुळे मानवी शरीरात अनुवांशिक बदल घडतात किंवा याचा संक्रमण दर हा प्रचंड वेगाने वाढत जातो. आतापर्यंत पाच व्हेरीयंटला VOI चा दर्जा मिळाला आहे. ज्याचे भारतात वेगवेगळे रुप ऑक्टोबरमध्ये आढळले होते. आता या वाढत असलेल्या संक्रमणामुळे आरोग्य, आकलनशक्ती आणि लसीच्या प्रभावावर घातक परिणाम होत आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ आणि संशोधकांच्या निरिक्षणांतून अशा व्हेरीयंटवर कोरोना लस प्रभावी आहे, असं समोर आलंय. या साथरोगाला कमी करण्यासाठी लसीकरणाशिवाय योग्य पर्याय नाही, असं काही तज्ञांचं म्हणणं आहे.

First published:

Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, South africa