मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोनामुळे चीनमध्ये पुन्हा हाहाकार! नवीन व्हेरिएंटमुळे मुलांना आई-वडिलांपासून ठेवले वेगळे

कोरोनामुळे चीनमध्ये पुन्हा हाहाकार! नवीन व्हेरिएंटमुळे मुलांना आई-वडिलांपासून ठेवले वेगळे

भारतात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. (Corona Patients in India) तर तेच दुसरीकडे चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा हाहाकार माजवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. (Corona Patients Increasing in China) कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटमुळे तिथली परिस्थिती आणखी भयानक झाली आहे. (Omicron Patients in China)

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 4 एप्रिल : भारतात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. (Corona Patients in India) तर तेच दुसरीकडे चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा हाहाकार माजवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. (Corona Patients Increasing in China) कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटमुळे तिथली परिस्थिती आणखी भयानक झाली आहे. (Omicron Patients in China) आकडेवारीचा विचार केला तर चीनमध्ये तब्बल 13 हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील कोरोनाचे हे नवीन रुग्ण ओमायक्रॉनच्या नवीन व्हेरिएंटशी संबंधित आहे, अशी माहिती चीनच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे. (Corona New Variant in China)

नवीन व्हेरिएंट कुठे आढळला?

या नवीन व्हेरिएंटची लक्षणं हे शांघाईपासून 70 किमी दूर अतंरावर असलेल्या उत्तरी चीनच्या डालियान या शहरात आढळले. याठिकाणी गेल्या शुक्रवारी याबाबतची नोंद करण्यात आली. हा नवीन व्हेरिएंट BA.1.1 उपप्रकारातून विकसित झाला आहे. तसेच तो कोरोनाच्या दुसऱ्या व्हेरिएंटसोबत मॅच होत नाही आहे. याला GISAID इथे सबमिट केले गेले नाही, असा अहवाल स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरुन ग्लोबल टाईम्सने (Global Times Report on Corona New Variant) दिला आहे. तर GISAID म्हणजे ती जागा जिथे जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनासंबंधित माहिती शेअर करतात आणि कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेऊन असतात.

संपूर्ण चीनमध्ये कोरोनाची लक्षणं नसलेले जवळपास 12 हजार रुग्णांची नोंद करण्यात आली. यानंतर चीन सरकार कोरोनाचे निर्बंध लागू केले आहेत. कोरोना परिस्थितीमुळे मुलांना त्यांच्या आई-वडिलांपासून वेगळे करुन क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे, असा दावा माध्यमांनी त्यांच्या अहवालामध्ये केला आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, तसेच नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर तेथील सरकारने कोरोना चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत.

Sri lanka Crises: श्रीलंकेसारखी भीषण स्थिती भारतातही निर्माण होऊ शकते, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली चिंता

भारतात दिलासा

दरम्यान, भारतातील कोरोना परिस्थिती नियत्रणांत आल्याचे चित्र आहे. (Corona Situation in India) देशात मागील 24 तासांत 1,096 इतक्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर रविवारी सकाळी सात वाजेपर्यंत देशात 184 कोटी 66 लाख 86 हजार 260 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिली आहे.

First published:

Tags: China, Corona spread, Coronavirus