मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

नव्या कोरोनाचा धोका वाढला! UK-भारत विमानसेवा 7 जानेवारीपर्यंत स्थगित

नव्या कोरोनाचा धोका वाढला! UK-भारत विमानसेवा 7 जानेवारीपर्यंत स्थगित

ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूचा (New COVID-19 strain) आता भारतामध्येही झपाट्यानं पसरत आहे.

    नवी दिल्ली, 30 डिसेंबर : ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी काही प्रवाशांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले तर देशात नव्या स्ट्रेनचे काही रुग्ण सापडल्यानं केंद्र सरकारनं तातडीनं पावलं उचलत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं 31 डिसेंबरपर्यंत युकेला जाणारी विमानसेवा स्थगित केली होती, त्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आता युकेला जाणाऱ्या विमानांचं उड्डाण 7 जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आलं आहे. हरदीपसिंग पुरी म्हणाले की- 'ब्रिटनमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेता भारत सरकारने निर्णय घेतला आहे की 7 जानेवारी 2021 रोजी रात्री 11:59 पर्यंत ब्रिटनहून भारतात येणारी सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित केली जातील. 22 डिसेंबरपासून ब्रिटनहून भारतात येणारी विमानं 7 जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत. हे वाचा-नव्या कोरोनाच्या दहशतीत मोदी सरकारने corona vaccine बाबत दिली Positive News ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूचा (New COVID-19 strain) आता भारतामध्येही झपाट्यानं पसरत आहे. ब्रिटनमधून देशात परतलेल्या नागरिकांपैकी 20 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. या 20 जणांपैकी 8 जण हे दिल्लीमधील आहेत. तर मेरठमध्ये 2 वर्षांच्या चिमुकलीच्या शरीरात कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यानं प्रशासन यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणा अलर्टवर आहेत.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या