मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /पुण्यातून आला रिपोर्ट गुजरातचं वाढलं टेन्शन, वाचा नेमकं काय आहे हे प्रकरण

पुण्यातून आला रिपोर्ट गुजरातचं वाढलं टेन्शन, वाचा नेमकं काय आहे हे प्रकरण

लंडन ते अहमदाबादला आलेल्या प्रवाशांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन सतर्क झालं आहे.

लंडन ते अहमदाबादला आलेल्या प्रवाशांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन सतर्क झालं आहे.

लंडन ते अहमदाबादला आलेल्या प्रवाशांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन सतर्क झालं आहे.

अहमदाबाद, 02 जानेवारी : भारतात नव्या कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार आता इंग्लडहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशांपैकी काही जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. चार प्रवाशांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला असल्यानं प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे. सध्या या चारही रुग्णांवर SVP रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

23 डिसेंबरला 175 प्रवासी लंडनहून अहमदाबादला आले होते. त्यापैकी चार रुग्णांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे अशी माहिती पुण्यातील वायरोलॉजी रिपोर्टमधून खुलासा झाला आहे. अद्याप 6 रुग्णांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली आहे. लंडन ते अहमदाबादला आलेल्या प्रवाशांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन सतर्क झालं आहे.

हे वाचा-सहन नाही झालं जोडीदाराच्या विरहाचं दुःख; म्हणून त्यानं चक्क 'रेल रोको' केलं!

भारतामध्ये झपाट्यानं पसरतोय नवा कोरोना, 30 डिसेंबरपर्यंत 20 रुग्णांना नव्या कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होत.ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूचा (New COVID-19 strain) आता भारतामध्येही झपाट्यानं पसरत आहे. ब्रिटनमधून देशात परतलेल्या नागरिकांपैकी 20 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. या 20 जणांपैकी 8 जण हे दिल्लीमधील आहेत.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठमध्ये 2 वर्षांच्या मुलीला मंगळवारी या विषाणूचा संसर्ग झाल्याचं उघड झालं होतं. ब्रिटनमधून आलेल्या सर्व नागरिकांची जीनोम सिक्वेन्सिंग (genome sequencing) च्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहे.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms