Home /News /coronavirus-latest-news /

CORONA ने पुन्हा बदललं आपलं रूप; दहापट घातक झाला व्हायरस

CORONA ने पुन्हा बदललं आपलं रूप; दहापट घातक झाला व्हायरस

कोरोनाव्हायरसचा नवा स्ट्रेन अधिक संक्रामक असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.

    वॉशिंग्टन, 14 जून : कोरोनाव्हायरसला (coronavirus) कसं रोखता येईल, यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. अशात कोरोनाव्हायरस आपलं रूप बदलताना दिसतो आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार कोरोनाव्हायरसचं म्युटेशन (coronavirus mutation) झालं आहे, ज्यामुळे तो दहापट अधिक घातक झाला असल्याचं सांगितलं जातं आहे. अमेरिकेतील स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्युटच्या शास्त्रज्ञांनी व्हायरसचा अभ्यास केला. ज्यामध्ये कोरोनाव्हायरसने आपल्या स्पाइक प्रोटिनची संरचना बदलल्याचं दिसतं आहे. कोरोनाव्हायरसच्या वरील भागात काट्यासारखी संरचना आहे ज्याला स्पाइक प्रोटिन म्हटलं जातं. हे स्पाइक प्रोटन्स मानवी पेशीतील प्रोटिनशी जोडले जातात आणि व्हायरस मानवी पेशींमध्ये प्रवेश करतात. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमध्ये स्पाइक प्रोटिन (spike protein) चारपट जास्त आहे. या नव्या स्ट्रेनला D614G असं नाव देण्यात आलं आहे.  शास्त्रज्ञांच्या मते,  D614G हा कोरोनाव्हायरस दहापट घातक आहे आणि जास्त संक्रामक आहे. अमेरिका, इटली आणि स्पेनमध्ये याच व्हायरसचा स्ट्रेन पसरल्याचं सांगितलं जातं आहे. न्यूयॉर्क टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे. संशोधनाचे अभ्यास Dr Hyeryun Choe यांच्या मते, स्पाइक जितके जास्त तितकाच व्हायरस घातक होत जाणार. हे वाचा - कोरोनापासूनही बचाव करणारा हसता-बोलता FACE MASK; एकदा व्हिडीओ पाहाच जगभरातील शास्त्रज्ञ व्हायरस आणि मानवी पेशींच्या याच प्रोटिनची जोड कशी कमजोर करता येईल किंवा तोडता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत आणि व्हायरसने आता आपल्या याच स्पाइक प्रोटिनमध्ये बदल केलेत. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा - घरच्या घरीही करू शकता कोरोनावर मात; डॉक्टरांनी सांगितला उपाय
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या