Home /News /coronavirus-latest-news /

बाहेरपेक्षा घरात राहणाऱ्यांना Coronavirus चा अधिक धोका; डॉक्टरांनी सांगितलं कारण

बाहेरपेक्षा घरात राहणाऱ्यांना Coronavirus चा अधिक धोका; डॉक्टरांनी सांगितलं कारण

नागरिकांनीही मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचं पालन आणि वारंवार हात धुण्याची सवय कायम ठेवावी असं आवाहनही सरकारने केलं आहे.

नागरिकांनीही मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचं पालन आणि वारंवार हात धुण्याची सवय कायम ठेवावी असं आवाहनही सरकारने केलं आहे.

'जे लोक घरात किंवा कार्यालयात राहतात त्यांना बाहेरील लोकांपेक्षा कोरोनाचा धोका जास्त असतो.'

    नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : कोरोनाची (Coronavirus) रुग्णसंख्या कमी होत असल्याचे पाहून कोरोना आटोक्यात आल्याचा विचार तुम्ही करत असाल तर तुम्ही चुकीचा विचार करताय. आता कुठे थंडी सुरू झाली आहे आणि गेल्या वर्षी हिवाळ्यानंतर हा व्हायरस जगभरात वेगाने पसरला. आता तो नव्याने वाढू शकेल असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. दरम्यान, आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे की, जे लोक घरात किंवा कार्यालयात राहतात त्यांना बाहेरील लोकांपेक्षा कोरोनाचा धोका जास्त असतो. यामागील एकमेव कारण म्हणजे हवामान. अमेरिकेचे माजी सर्जन जनरल भारतवंशी डॉ. विवेक मूर्ती यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका बाहेरील (outdoor) पेक्षा आत (indoor) राहणाऱ्यांना जास्त असतो. लोक पार्टीसाठी, डिनरसाठी एकत्र जमत आहेत. ज्यामुळे कोरोनाचा वेग वाढला आहे. ते म्हणाले की, आता हिवाळ्याचा हंगाम आला आहे. अशा वेळी प्रत्येकजण बाहेर पडण्याऐवजी आतच राहणे पसंत करतात. हे ही वाचा-2021 मध्ये परिस्थिती बिघडणार; कोरोनाबरोबरच या महासाथीसाठी दिला इशारा कोरोना व्हायरससाठी ही परिस्थिती सर्वात अनुकूल आहे. डॉ. विवेक मूर्ती हे अमेरिकेत वाढत्या घटनांविषयी सांगतात की पूर्वी लोक त्यांच्या हद्दीत रहायचे, पण आता ते व्याप्ती मोडत आहे. कोरोना कसा थांबवायचा आणि स्वतःचे रक्षण कसे करावे हे आपल्यावर अवलंबून आहे. एका प्रश्नाचं उत्तर देताना डॉ. मूर्ती म्हणाले की, कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यास कोणत्याही हेतूशिवाय लॉकडाउन करणं अनावश्यक आहे. यापासून आर्थिक व्यवस्था बिघडण्याखेरीज काहीही मिळणार नाही. डॉ. मूर्ती सध्या कोरोना नियंत्रित करण्यासाठी नवनिर्वाचित अध्यक्ष जो बिडेन यांनी स्थापन केलेल्या सल्लागार समितीचे सह-अध्यक्ष आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या