देशात 20 लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात! वाचा 24 तासांतील लेटेस्ट आकडेवारी

देशात 20 लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात! वाचा 24 तासांतील लेटेस्ट आकडेवारी

भारतात चाचणी आणि आयसोलेशनच्या दिशेने जलद काम केले गेले आहे, ज्याचा परिणाम वाढती रिकव्हरी रेट वाढत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या वाढून आता 27 लाख 67 हजार 274 झाली आहे. आज एकाच दिवसात 64 हजार 531 रुग्ण सापडले. तर, 1092 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशात 6 लाख 76 हजार 514 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे देशातील निरोगी रुग्णांची संख्या आता 20 लाख 37 हजार 871 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 73.64% झाला आहे.

देशात आतापर्यंत 52 हजार 889 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात चाचणी आणि आयसोलेशनच्या दिशेने जलद काम केले गेले आहे, ज्याचा परिणाम वाढती रिकव्हरी रेट वाढत आहे. तर मृत्यूदर घटला आहे. अॅक्टिव्ह रुग्ण आणि रिकव्हर रुग्णांमधील फरक सुमारे 13 लाख आहे. मंगळवारी पहिल्यांदाच देशात 9 लाखाहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रातील आकडेवारी

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांनाच मंगळवारी उच्चांकी 424 रुग्णांचा मृत्यू झालाय. आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. मंगळवारी राज्यात 11 हजार 119 नवे रुग्ण आढळले. तर 9 हजार 356 रुग्णांना घरी सोडण्यात आलं. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 6 लाख 15 हजार एवढी झाली आहे. तर राज्यात सध्या 1 लाख 56 हजार लोक उपचार घेत आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेस, कर्नाटक राज्यांचा रिकव्हरी रेट कमी आहे. तर दिल्लीचा रिकव्हरी रेट सर्वात जास्त आहे.

कोरोना प्रभावित टॉप-10 देश

जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या 24 तासांत जगातील 213 देशात 2.50 लाख नवीन रुग्ण सापडले तर, 6287 रुग्णांचा मृत्यू झाला. जगभरात आतापर्यंत 2.22 कोटी नवीन रुग्ण सापडले आहेत. वर्ल्डमीटरने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत 56 लाखाहून अधिक लोकांचा येथे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत अमेरिकेत 43 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे समोर आली आहेत आणि 1358 लोक मरण पावले आहेत. त्याच वेळी, ब्राझीलमध्ये 24 तासांत 48 हजार प्रकरणे झाली आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: August 19, 2020, 10:05 AM IST

ताज्या बातम्या