करून दाखवलं! रुग्णांच्या संख्येत घट, तर रिकव्हरी रेट वाढला; वाचा दिलासादायक आकडेवारी

करून दाखवलं! रुग्णांच्या संख्येत घट, तर रिकव्हरी रेट वाढला; वाचा दिलासादायक आकडेवारी

आज गेल्या काही दिवसांच्या तुलनेत नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. आज एका दिवसात 75 हजार 809 नवीन रुग्णांची नोंद झाली.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 सप्टेंबर : देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्या 42 लाख 80 हजार 423 झाली आहे. असे असले तरी आज गेल्या काही दिवसांच्या तुलनेत नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. आज एका दिवसात 75 हजार 809 नवीन रुग्णांची नोंद झाली. गेल्या दोन दिवसांपासून सतत 90 हजारहून अधिक रुग्ण सापडत असताना आजची आकडेवारी दिलासा देणारी आहे. तर, आज 1133 रुग्णांचा मृत्यू झाला.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात एकूण 72 हजार 775 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, निरोगी झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. 24 तासात रेकॉर्ड ब्रेक 74 हजार 123 रुग्ण निरोगी झाले आहेत. तर, एकूण निरोगी रुग्णांची संख्या 33 लाख 23 हजार 951 आहे. तर, देशात 8 लाख 83 हजार 697 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

वाचा-लहान मुलांमध्ये दिसला कोरोनाचा धोकादायक सिंड्रोम MIS-C, ही आहेत लक्षणं

वाचा-दिलासा! महाराष्ट्रात COVID-19 टेस्टचे दर घटले; आता स्वस्तात कोरोना चाचणी

भारताच्या तुलनेत गेल्या 24 तासांत अमेरिकेत 25 हजार 325 आणि ब्राझीलमध्ये 10 हजार 188 नवीन रुग्ण आढळून आले. तर, एका दिवसात अमेरिकेत 286 आणि ब्राझीलमध्ये 315 रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि ब्राझीलच्या तुलनेत भारतात सर्वात जास्त नवीन प्रकरणं समोर येत आहेत.

वाचा-COVID-19: कोरोनावरच्या या 5 लशींपासून जगाला आहे सर्वात जास्त आशा

आतापर्यंत 5 कोटीहून अधिक टेस्टिंग

देशातील कोरोना टेस्टिंगचा आकडा 5 कोटी पार झाला आहे. या 5 कोटी टेस्टमध्ये 8.47% लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ICMRच्या मते 24 तासांत 7 लाखहून अधिक लोकांची चाचणी करण्यात आली. टेस्टिंगमध्ये चीन पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. यात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: September 8, 2020, 10:09 AM IST

ताज्या बातम्या