अखेर 6 दिवसांनी समोर आली दिलासादायक आकडेवारी, नवीन रुग्णांच्या संख्येत घट

अखेर 6 दिवसांनी समोर आली दिलासादायक आकडेवारी, नवीन रुग्णांच्या संख्येत घट

सलग 6 दिवस देशात 75 हजारहून अधिक रुग्ण सापडत होते. अखेर आज नवीन रुग्णांच्या संख्येत काही प्रमांणात घट झालेली पाहायला मिळाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 सप्टेंबर : देशातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत होती. 25 ऑगस्ट रोजी 60 हजार नवीन रुग्ण सापडल्यानंतर सलग 6 दिवस देशात 75 हजारहून अधिक रुग्ण सापडत होते. अखेर आज नवीन रुग्णांच्या संख्येत काही प्रमांणात घट झालेली पाहायला मिळाली आहे. गेल्या 24 तासांत 69 हजार 921 नवीन रुग्ण सापडले आहे. तर, 819 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात एकूण 36 लाख 91 हजार 167 नवीन कोरोना रुग्ण आहेत. तर, 7 लाख 85 हजार 669 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आतापर्यंत 28 लाख 39 हजार 883 रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. तर, 65 हजार 288 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

वाचा-Mission Begin Again मध्ये राज्यात काय सुरू आणि काय बंद राहणार?

वाचा-कोरोनाला रोखण्यासाठी 90% देशांकडे आरोग्य यंत्रणाच नाही, WHOचा खुलासा

राज्यांची स्थिती

महाराष्ट्र राज्यातली एकूण Covid-19 रुग्णसंख्या 8 लाखांच्या जवळ पोहोचली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 11,852 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्याबरोबरच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही 11,158 आहे. अॅक्टिव्ह रुग्णसंख्या कमी होत असलेल्या पुणे, मुंबई आणि ठाण्यात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढते आहे. शिवाय नागपूर, नाशिकमध्येही अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पाच आकडी झाल्याने चिंता वाढली आहे.

वाचा-पुणे, मुंबई, ठाण्यात पुन्हा वाढू लागले रुग्ण; Coronavirus चे महाराष्ट्रातले आकडे

जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच

जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार, जगभरात सध्या 2 कोटी 53 लाख 18 हजार 901 कोरोना रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 8 लाख 47 हजार 797 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. व्हाइट हाउसकडून जनतेला असे सांगण्यात आले आहे की, लशीची वाट पाहू नका तुम्ही सावध रहा. तर युरोपातील बऱ्याच देशांमध्ये शाळा पुन्हा सुरू करण्याची तयारी केली जात आहे

Published by: Priyanka Gawde
First published: September 1, 2020, 9:57 AM IST

ताज्या बातम्या