Home /News /coronavirus-latest-news /

सलग पाचव्या दिवशी 90 हजारहून अधिक रुग्णांची नोंद, कोरोनाबाधितांची संख्या 48 लाख पार

सलग पाचव्या दिवशी 90 हजारहून अधिक रुग्णांची नोंद, कोरोनाबाधितांची संख्या 48 लाख पार

तर दिवसभरात 1 हजार 428 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

तर दिवसभरात 1 हजार 428 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

गेल्या 24 तासांत 92 हजार 071 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. गेल्या पाच दिवसातील हा कमी आकडा आहे. तर, एकाच दिवसात 1136 लोकांचा मृत्यू झाला आहे.

  नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : सलग पाचव्या दिवशी आज 90 हजारहून नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या 48 लाख पार झाली आहे. गेल्या 24 तासांत 92 हजार 071 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. गेल्या पाच दिवसातील हा कमी आकडा आहे. तर, एकाच दिवसात 1136 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह एकूण मृतांचा आकडा 79 हजार 722 झाला आहे. आतापर्यंत 37 लाख 80 हजार 108 लोक निरोगी झाले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात 9 लाख 86 हजार 598 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात 74% अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुख्य म्हणजे हे सर्व रुग्ण देशातील 9 राज्यांमध्ये आहेत. सर्वात जास्त रुग्ण 28% महाराष्ट्रातील आहेत. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे, तिथं 11% रुग्ण आहेत. तिसऱ्या स्थानावर आंध्र प्रदेश 10% अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशात 7%, तामिळनाडुत 5%, ओडिशात 4%, तेलंगणा, आसाम, आणि छत्तीसगढमध्ये 3-3% अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. बाकी 26% रुग्ण हे इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत. मृत्यूदरात घट, रिकव्हरी रेट वाढला दिलासादायक बाब म्हणजे मृत्यूदरात सलग घट होत आहे. तर, रिकव्हरी रेट वाढत आहे. मृत्यूदर सध्या 1.64% आहे. तर, अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही घट झाला आहे. सध्या 21% अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रिकव्हरी रेट 78% आहे. ICMRनुसार 13 सप्टेंबरपर्यंत कोरोनाचे एकूण 5 कोटी 72 लाख सॅंपल टेस्ट केले गेले होते. यांपैकी 10 लाख सॅंपलची टेस्टिंग रविवारी करण्यात आली. राज्यांची परिस्थिती रिकव्हरी रेटबाबत बोलायचे झाल्यास बिहारचा रिकव्हरी सर्वात जास्त म्हणजेच 90.6% आहे. तर सर्वात कमी छत्तीसगढचा आहे. 2021 पर्यंत अशी असणार परिस्थिती? अमेरिकेचे प्रसिद्ध कोरोना व्हायरस विशेषज्ज्ञ डॉ. एंथनी फाउची यांनी सांगितले की 2021 वर्षाच्या शेवटपर्यंत जीवन सर्वसामान्य होणार नसल्याची शक्यता आहे. फाउचीने सांगितले की, कोरोना व्हायरसची लस मदत करू शकेल, मात्र यातही काही अटी आहेत. त्यांचं असंही म्हणणं आहे की कोरोनाच्या ज्या लसीवर काम होत आहे, त्यापैकी एकाला 2020 च्या शेवटपर्यंत वा 2021 ला मंजुरी मिळेल. फाउचीचं म्हणणं आहे की, जरी लशीला या वर्षी वा पुढील वर्षाच्या शेवटापर्यंत मंजुरी मिळेल. मात्र तरीही ही लस नागरिकांना तातडीने उपलब्ध करता येणार नाही. MSNBC सोबत दिलेल्या मुलाखतीत फाउचींनी सांगितले की, मंजुरी मिळाल्यानंतर लशीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि सप्लाय करण्याची गरज आहे. 2021 च्या मध्याच्या शेवटपर्यंत लोकसंख्येच्या मोठ्या भागातील लोकांना लस देणं आणि त्यांना सुरक्षित करण्याचं काम पूर्ण होईल, असं दिसून येत नाही.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Corona, Corona virus in india

  पुढील बातम्या