LIVE: सातारा जिल्ह्यातही लसीकरण बंद! 447 केंद्रांवर लशींचा तुटवडा

कोरोना त्याचप्रमाणे राज्य आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | April 24, 2021, 14:18 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  21:42 (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठपुराव्याला यश
  राज्यात रेमडेसिवीरचा पुरवठा वाढला
  मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान मोदींचे आभार

  राज्यातील रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारचं वेधलं होतं लक्ष; पंतप्रधानांना देखील पत्राद्वारे केली होती विनंती; केंद्रानं महाराष्ट्रासाठी 30 एप्रिलपर्यंत 4 लाख 35 हजार व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार  

  20:49 (IST)

  यवतमाळ - 19 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचं पलायन
  घाटंजी कोविड सेंटरमधील धक्कादायक प्रकार 
  वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घाटंजी पोलिसांत तक्रार
  आरोग्य यंत्रणेकडून फरार रुग्णांचा शोध सुरू 

  20:49 (IST)

  विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं ट्विट
  'अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला सर्वाधिक रेमडेसिवीर'
  'नव्यानं वितरीत 5 लाखांपैकी राज्याला 1,65,800 रेमडेसिवीर'
  'आतापर्यंतच्या 16 लाखांपैकी राज्याला 4,35,000 रेमडेसिवीर'
  तेही केवळ 10 दिवसांसाठी - देवेंद्र फडणवीस

  केंद्र सरकारनं आश्वासित केल्याप्रमाणं अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला रेमडेसिवीरचं सर्वाधिक वितरण - देवेंद्र फडणवीस

  नव्यानं वितरण जाहीर झालेल्या 5 लाखांपैकी महाराष्ट्राला 1,65,800 अर्थात 34 टक्के रेमडेसिवीर - देवेंद्र फडणवीस

  आतापर्यंतच्या एकूण 16 लाख रेमडेसिवीरपैकी 4,35,000 आणि तेही केवळ 10 दिवसांसाठी - देवेंद्र फडणवीस

  20:26 (IST)

  महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच
  राज्यात दिवसभरात 67 हजार 160 नवे रुग्ण
  राज्यात दिवसभरात 63 हजार 818 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 676 कोरोना रुग्णांचा मृत्यू
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 82.02, मृत्युदर 1.51%
  राज्यात सध्या 6 लाख 94,480 अॅक्टिव्ह रुग्ण
  नवे रुग्ण वाढल्यानं अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

  20:21 (IST)

  सीबीआय टीम पुन्हा अनिल देशमुखांच्या घरी
  अनिल देशमुख काटोल दौऱ्यावरून पुन्हा घरी
  कोविड सेंटरची पाहणी करण्यासाठी गेले होते
  देशमुख नियोजित कार्यक्रम सोडून पुन्हा घरी 

  19:37 (IST)

  मुंबईत दिवसभरात 5888 नवे कोरोना रुग्ण
  मुंबईत दिवसभरात 8549 रुग्ण कोरोनामुक्त
  मुंबईत दिवसभरात 71 कोरोना रुग्णांचा मृत्यू
  कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 54 दिवस 

  19:32 (IST)

  कोल्हापूर - हुपरीतल्या शांतीनगरमधील घटना
  रिव्हॉल्वर साफ करताना गोळी सुटून मुलगा ठार
  चांदी उद्योजकाचा मुलगा सागर गाटचा मृत्यू
  वडील रिव्हॉल्वर साफ करताना गोळी लागली 

  18:59 (IST)

  अनिल देशमुखांची जवळपास 10 तास चौकशी 

  18:57 (IST)

  अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी संपली 
  देशमुखांच्या नागपुरातील घरातून सीबीआय बाहेर
  सीबीआय टीमसोबत काही कागदपत्रांच्या फाईल्स
  सीबीआय पथकाला सहकार्य केलं -अनिल देशमुख 

  17:52 (IST)

  पुण्यातील कोरोना आढावा बैठक संपली
  बैठकीत कोरोना स्थितीचा आढावा -अजित पवार
  'राज्यातील ऑक्सिजन पुरवठ्यावरून प्रश्न निर्माण'
  'ऑक्सिजन पुरवठ्याबाबत सर्व स्तरावर प्रयत्न'
  'कोविड सेंटर उभारण्यासाठी योग्य परवानगी घ्यावी'
  'केवळ रिकामे टँकर विमानातून नेण्यास परवानगी'
  'भरलेले टँकर रेल्वे किंवा रस्ते वाहतुकीनं आणणार'
  रेमडेसिवीरसाठी ग्लोबल टेंडर काढणार -अजित पवार
  लसीसाठीही ग्लोबल टेंडर काढणार -अजित पवार
  ग्लोबल टेंडरसाठी 5 जणांची समिती -अजित पवार
  पुण्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण वाढतंय -अजित पवार
  'ऑक्सिजन निर्मितीसाठी साखर कारखान्यांचा पर्याय'
  साखर संघाशी बोलणं सुरू आहे -अजित पवार
  'केंद्रानं जामनगरमधून मिळणारा कोटा कमी करू नये'
  'रेमडेसिवीर कोटा पुरेसा मिळण्याबाबत केंद्राला विनंती'
  'कोविड खर्चासाठी विभागीय आयुक्तांना अधिकार'
  जनतेला मोफत लस देण्याचा विचार सुरू -अजित पवार
  लस मोफत देण्यावर 1 मे रोजी निर्णय -अजित पवार
  मोफत लसीवर मुख्यमंत्री भूमिका घेतील -अजित पवार
  दररोज 1 लाख लसीकरणाचं उद्दिष्ट -अजित पवार
  'अनिल देशमुखांशी अजून बोलणं झालं नाही'
  'केंद्रीय एजन्सीमार्फत चौकशी झाल्याचं कळलं'
  'चौकशीला सहकार्य होईल, पण ती निप्षक्ष व्हावी' 

  कोरोना त्याचप्रमाणे राज्य आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स