LIVE: '45 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांना अजूनही मिळेल मोफत लस', PM मोदींची Mann Ki Baat मध्ये माहिती

कोरोना त्याचप्रमाणे देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे लेटेस्ट अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | April 25, 2021, 11:48 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  21:8 (IST)

  कठीण काळात उद्योजकांचा मदतीचा हात
  'सीआयटी'कडून उद्योजकांचं कौतुक
  रिलायन्स उद्योग समूहाचे मानले आभार
  रिलायन्स उद्योगानं केला ऑक्सिजन पुरवठा

  21:0 (IST)

  राज्यात दिवसभरात 66,191 नवीन रुग्ण
  राज्यात मृतांच्या संख्येत पुन्हा वाढ
  राज्यात दिवसभरात 832 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात दिवसभरात 61,450 कोरोनामुक्त
  राज्यात सध्या 6 लाख 98,354 ॲक्टिव्ह रुग्ण

  20:6 (IST)

  कोल्हापूर - जोतिबा यात्रेसाठी मानकऱ्यांच्या केलेल्या तपासणीत 5 मानकरी आढळले पॉझिटिव्ह, जोतिबा डोंगरावरही अनेक पॉझिटिव्ह रुग्ण, सोमवारी होणारी यात्रा कोरोनामुळे रद्द, मानकरीही पॉझिटिव्ह आढळल्यानं पारंपरिक विधीवरही सावट, जोतिबा मंदिराकडे जाणारे सर्वच रस्ते बंद, मीडियालाही परवानगी नाही

  19:17 (IST)

  नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन कोविड सेंटर
  कोविड केअर सेंटर स्वयंपूर्ण होणार - एकनाथ शिंदे
  'बेसमेंटमध्ये 75 ICU बेडची सुविधा नव्यानं सुरू'
  ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभा राहणार - शिंदे
  नगरविकास मंत्र्यांची कोविड केअर सेंटरला भेट
  नव्यानं उभारण्यात आलेल्या सुविधेची केली पाहणी

  18:45 (IST)

  मुंबईतल्या कोरोना रुग्णांना दिलासा देणारी बातमी
  'मुंबई शहरातला ऑक्सिजन पुरवठा सुरळीत'
  तुटवडा नसल्याची मनपा आयुक्त चहल यांची माहिती

  18:23 (IST)

  मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी
  मुंबईतली लसीकरण केंद्र उद्यापासून सुरू
  मुंबई महापालिकेला 1.5 लाख डोस मिळाले
  कोव्हिशिल्डचे डोस मिळाले - मनपा आयुक्त चहल
  मात्र अजूनही कोव्हॅक्सिनचा तुटवडा कायम
  तुटवड्यामुळे दुसऱ्या डोससाठीच होणार वापर
  निवडक सेंटरवर कोव्हॅक्सिन उपलब्ध​

  18:18 (IST)

  नागपुरात दिवसभरात 7771 नवीन रुग्ण
  नागपुरात दिवसभरात 87 रुग्णांचा मृत्यू

  17:40 (IST)

  पुणे - आम्ही फिरती लॅब सुरू केली, दिवसाला 6 हजार टेस्ट होतील, पुणे शहरात 2 हजार ऑक्सिजन बेड, चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारानं उभारलेल्या 40 ऑक्सिजन बेडच्या रुग्णालयाचं लोकार्पण

  17:35 (IST)

  कोल्हापूर जिल्ह्याला पावसानं झोडपलं
  कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाच्या सरी 
  चंदगड, नेसरी भागात मुसळधार पाऊस
  अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडित
  उकाड्यानं हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना दिलासा

  17:23 (IST)

  पुण्यात आताच 30 हजार लसी मिळाल्यात - अग्रवाल
  'उद्यापासून सर्व केंद्र पूर्ण क्षमतेनं सुरू होतील'
  अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांची माहिती

  कोरोना त्याचप्रमाणे देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे लेटेस्ट अपडेट्स