काळजी घ्या! 'हा' आजार असलेल्या कोरोना रुग्णांना मृत्यूचा तिप्पट धोका

काळजी घ्या! 'हा' आजार असलेल्या कोरोना रुग्णांना मृत्यूचा तिप्पट धोका

कॅन्सर असलेल्या रुग्णांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्यास इतर कोरोना रुग्णांच्या तुलनेत त्यांचा मृत्यूदर जास्त असल्याचं संशोधनात दिसून आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 मे : ज्या लोकांना आधीपासून मधुमेह, श्वसनसंबंधी आजार किंवा हृदयासंबंधी एखादा गंभीर आजार आहे, तर त्यांना कोरोनाव्हायरसचा धोका जास्त असतो. मात्र नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, जर कॅन्सर रुग्णांना कोरोनाव्हायरसची लागण झाली तर त्यांच्या मृत्यूचा धोका तीन पटीनं वाढतो.

चीन, सिंगापूर आणि अमेरिकेतल्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. संशोधकांना दिसून आलं आहे की, जर एखाद्या रुग्णाला ब्ल्ड कॅन्सर (Blood Cancer) आणि फुफ्फुसाचा कॅन्सर (Lungs Cancer) असेल तर त्या कोरोना रुग्णाचा मृत्यूचा धोका जास्त असतो.

चीनच्या हुबेई प्रांतातील कोरोना रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये समान वयाच्या 105 कॅन्सर रुग्णांचा समावेश होता, याशिवाय 536 रुग्ण होते, ज्यांना कॅन्सर नव्हता.संशोधकांनी सांगितलं की, सामान्य कोरोनाग्रस्तांचा मृत्यू 2 ते 3 टक्के आहे. तर कॅन्सरग्रस्त कोरोना रुग्णांच्या मृत्यूदर तीन पट जास्त आहे. कॅन्सर रुग्ण कोरोनाव्हायरसच्या विळख्यात येण्याची आणि गंभीर होण्याची शक्यताही जास्त असते.

हे वाचा - काळजी घ्या! 'हा' आजार असलेल्या कोरोना रुग्णांना मृत्यूचा तिप्पट धोका

अमेरिकेत 218 कॅन्सर रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. हे रुग्ण 18 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान कोरोना संक्रमित झाले होते. त्यापैकी 61 कॅन्सर रुग्णांचा संक्रमणामुळे मृत्यू झाला.  संशोधनात दिसून आलं की, सामान्य कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण 5.8 टक्के होतं, तर कॅन्सरग्रस्त कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण 28 टक्के आहे.

फुफ्फुस कॅन्सर असलेल्या रुग्णांचा कोरोनामुळे होणारा मृत्यूदर सर्वात जास्त म्हणजे 55 टक्के आहे. तर त्यानंतर पोटाचा कॅन्सर असलेल्या रुग्णांचा 38 टक्के,  ब्लड कॅन्सर रुग्णांचा 37 टक्के, प्रोस्ट्रेट कॅन्सर रुग्णांचा 20 टक्के आणि स्तन कॅन्सर रुग्णांचा 14 टक्के मृत्यूदर आहे.

हे वाचा - कोरोनापासून वाचण्यासाठी प्यायले स्वत: बनवलेलं औषध आणि त्याच औषधाने घेतला जीव

शास्त्रज्ञांच्या मते, कॅन्सर रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी झाल्यानं असं होतं आहे. त्यामुळे कॅन्सर रुग्णांवरील उपचारासाठी एक वेगळी रणनीती तयार करायला हवी, जेणेकरून कॅन्सर रुग्णांना कोरोना संक्रमणापासून वाचवलं जाईल.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: May 9, 2020, 6:31 PM IST

ताज्या बातम्या