मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप; पुण्याची धक्कादायक आकडेवारी

Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप; पुण्याची धक्कादायक आकडेवारी

कोणत्याही सामाजिक सांस्कृतिक / राजकीय / धार्मिक मेळाव्यास अनुमती दिली जाणार नाही. सभामंडप किंवा नाटक थिएटर देखील मेळावा आयोजित करण्यासाठी वापरु नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कोणत्याही सामाजिक सांस्कृतिक / राजकीय / धार्मिक मेळाव्यास अनुमती दिली जाणार नाही. सभामंडप किंवा नाटक थिएटर देखील मेळावा आयोजित करण्यासाठी वापरु नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Coronavirus in maharashtra update : यावर्षातील सर्वाधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद आज झाली आहे.

मुंबई, 17 मार्च : राज्यात कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus in maharashtra) दुसऱ्या लाटेचा प्रकोप पाहायला मिळतो आहेत. आज दिवसभरात 23 हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या दीड लाखांच्या वर गेली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोनाची धक्कादायक अशी आकडेवारी जारी केली आहे. गेल्या तीन महिन्यातील सर्वाधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात आज तब्बल 23,179 नवीन रुग्णांचं निदान झालं आहे. त्यानंतर राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या  23,70,507 वर पोहोचली आहे. त्यापैकी 21,63,391 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज दिवसभरात 9,138 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण  (Recovery Rate) 91.26% एवढे झालं आहे. तर आज 84 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.24% एवढा आहे. आता एकूण 1,52,760 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशाच्या एकूण कोरोना प्रकरणांपैकी 60 टक्के प्रकरणं एकट्या महाराष्ट्रात आहेत.

देशातील सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त जिल्हे आहेत. त्यातही पुणे पहिल्या क्रमांकावर आहे. पुण्यात तब्बल 32359 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

राज्यात का वाढतोय कोरोना?

Maharashtra covid task force चे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामागे दोनच ठळक कारणं आहेत. कोविड नियम लोक गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. रेस्टॉरंट्समध्ये विनामास्क जाणारे नागरिक हे कोरोनाच्या प्रसारामागचं प्रमुख कारण असल्याचं डॉक्टर सांगतात.

हे वाचा - ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढला तर..., पंतप्रधानांनी व्यक्त केली भीती

महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोना केसेसमध्ये समोर आलेली आणखी एक बाब म्हणजे अँटिबॉडीजची संख्या झपाट्याने कमी होते आहे. एकदा या विषाणूचा हल्ला परतवून लावला तरी पुन्हा कोरोनाची लागण झालेले रुग्ण दिसू लागले आहेत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हलगर्जीपणा करून चालणार नाही. कोरोना लसीकरण वाढलं, तसं लोकही बिनधास्त घराबाहेर पडू लागले आहेत. पण लस घेतल्यानंतरही कोरोना नियम पाळावेच लागतील. लशीचा परिणाम लगेच सुरू होत नाही. शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे लसीकरणानंतर 2 महिने काळजी घेत राहणं आवश्यक आहे, असंही जोशी यांनी सांगितलं.

पंतप्रधान मोदींनी दिली स्ट्रॅटेजी

महाराष्ट्रानंतर देशातील इतर राज्यांमध्येही कोरोना व्हायरस (Coronavirus in India) वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हर्च्युअल बैठक पार पाडली.  यानंतर पंतप्रधानांनी या व्हरच्यूल बैठकीच्या माध्यमांतून सर्वांना संबोधित केले.

हे वाचा - अनेक देशांत AstraZeneca च्या कोरोना लशीवर बंदीनंतर भारतानेही घेतला मोठा निर्णय

दरम्यान कोरोनाच्य दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी त्वरित आणि निर्णायक पावलं उचलली पाहिजेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. यासाठी 'Test, Track and Treat' ही त्रिसुत्री वेळोवेळी वापरावी लागणार आहे. अर्थात  चाचणी, त्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना शोधणे आणि या सर्वांवर उपचार करण्यावर त्यांनी भर दिला आहे. शिवाय आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्याचाही सल्ला दिला आहे.

First published:

Tags: Coronavirus