मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

घाबरू नका, कोरोनाला हरवणं शक्य; भारतातल्या 70% रुग्णांनी करून दाखवलं

घाबरू नका, कोरोनाला हरवणं शक्य; भारतातल्या 70% रुग्णांनी करून दाखवलं

  • Published by:  Priya Lad
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : भारतातील कोरोना (India coronavirus) रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहेत.  देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 23 लाख पार झाली आहे. गेल्या 24 तासातही 60 हजार 963 रुग्ण सापडले. तर, आतापर्यंत 704 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून देशात एका दिवसात 60 हजारहून अधिक रुग्ण सापडत आहे. त्यामुळे आकडा पाहिला की धडकीच भरते. मात्र हेच कोरोनाग्रस्त रुग्ण कोरोनाशी दोन हात करत त्याला हरवत आहे आणि ही दिलासादायक अशी बातमी आहे. कोरोनाला हरवणं शक्य आहे हे 70% रुग्णांनी करून दाखवलं आहे. भारतातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 70 टक्के झालं आहे. म्हणजे इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाविरोधातील लढा यशस्वीरित्या जिंकला आहे. एकाच दिवसात 56,110 रुग्ण बरे झाले आहेत आणि आतापर्यंत बऱ्या झालेल्या रुग्णांची ही सर्वाधिक आकडेवारी आहे. हे वाचा - चिंताजनक! कोविड-19 साथीत वाढले ब्रोकन हार्ट सिंड्रोमचे रुग्ण आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 23 लाख पार झाली आहे. यात 6 लाख 43 हजार 948 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 46 हजार 91 रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 16 लाख 39 हजार 599 रुग्ण निरोगीही झाले आहे. यासह भारताचा रिकव्हरी रेट 70% झाला आहे. हे वाचा - रशियानंतर आता आणखी एका देशानं तयार केली Corona Vaccine, लवकरच करणार घोषणा महाराष्ट्रात मंगळवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली. एका दिवसात तब्बल अकरा हजार 88 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ही 5 लाख 35 हजार 601 एवढी झाली आहे. तर दिवसभरात 256 रुग्णांचा मृत्यू झालाय. राज्यातील मृत्युदर 3.42 टक्के इतका आहे. राज्यात आज 10 हजार 14 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. राज्यात आजपर्यंत तीन लाख 68 हजार 435 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 68.79 टक्के एवढं झालं आहे.
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या