Coronavirus News Updates: 24 तासांत 48 हजार नवीन रुग्णांची नोंद, तर निरोगी रुग्णांचा आकडा 10 लाखांच्या घरात

Coronavirus News Updates: 24 तासांत 48 हजार नवीन रुग्णांची नोंद, तर निरोगी रुग्णांचा आकडा 10 लाखांच्या घरात

गेल्या 24 तासांत 48 हजार 513 नवीन रुग्ण सापडले. तर, 768 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण मृतांची संख्या 34 हजार 224 झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 जुलै : देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता 25 लाखांवर गेली आहेत. आतापर्यंत देशात 15.31 लाख एकूण कोरोना रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 48 हजार 513 नवीन रुग्ण सापडले. तर, 768 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण मृतांची संख्या 34 हजार 224 झाली आहे. तर, 10 लाखांहून अधिक रुग्ण निरोगी झाले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत कोरोनाचे 5 लाख 9 हजार 447 सक्रीय रुग्ण आहेत. तर, 9 लाख 88 हजार 29 लोकं निरोगी झाले आहे. आज देशात 10 लाख रुग्ण निरोगी होण्याच्या मार्गावर आहेत.

महाराष्ट्रात आतापर्यंत 14 हजार 165 मृत्यू

मंगळवारी एका दिवसाता महाराष्ट्रात 7 हजार 717 नवीन कोरोना रुग्ण सापडले. यासह महाराष्ट्र राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3 लाख 91 हजार 440 झाली आहे. राज्यातील एकूण मृतांचा आकडा आता 14 हजार 165 झाला आहे. तर, 10 हजार 333 रुग्ण एका दिवसात निरोगीही झाले. यासह निरोगी रुग्णांची संख्या 2 लाख 32 हजार 277 झाली आहे.

रिकव्हरी रेट 64.23%, डेथ रेट 2.25 %

गेल्या 5 दिवसांत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या 30 हजारहून अधिक झाली आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 64.23 झाला आहे. सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूदरही 2.25% आहे. देशातील महाराष्ट्र, तामिळनाडु, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात सर्वात जास्त कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर, दिल्लीचा रिकव्हरी रेट 88% झाला आहे.

पॉझिटिव्हिटी रेटही झाला कमी

आरोग्य मंत्रालय आणि ICMRने दिलेल्या आकडेवारीनुसार देशातील पॉझिटिव्हिटी रेट कमी झालेला पाहायला मिळाला आहे. गेल्या 24 तासांत 5 लाख 28 हजार 082 चाचण्या करण्यात आल्या, या दरम्यान 47 हजार 704 सॅंपल पॉझिटिव्ह आले आहेत. देशाताल सकारात्मकता दर 11.86% आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: July 29, 2020, 11:00 AM IST

ताज्या बातम्या