Home /News /coronavirus-latest-news /

घरातल्या घरात असा पसरतो कोरोनाव्हायरस, कम्युनिटीपेक्षा कुटुंबामध्ये संक्रमणाचा धोका जास्त

घरातल्या घरात असा पसरतो कोरोनाव्हायरस, कम्युनिटीपेक्षा कुटुंबामध्ये संक्रमणाचा धोका जास्त

इतर कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) तुलनेत सार्स कोव 2 घरात जास्त वेगाने पसरतो, असं संशोधनात दिसून आलं आहे.

    नवी दिल्ली : कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्याने कोरोनाव्हायरस (Coronavirus) पसरतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला दिला जातो. कोरोनाव्हायरस होऊ नये म्हणून आपण घराबाहेरील व्यक्तींशी संपर्क टाळतो आहे, मात्र घरातील व्यक्तींच्या संपर्कात तर आपण येतोच. घरातल्या घरातच हा व्हायरस कसा पसरतो याबाबत चीनमध्ये संशोधन झालं. चीनच्या संशोधकांनी सार्स कोव-2 घरात कशा पद्धतीने पसरतो याचा अभ्यास केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार क्लिनिक इन्फेक्शिअस डिसीज जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. संशोधकांनी चीनमधील 2 रुग्णालयातील  1 ते 20 फेब्रुवारीपर्यंतचे आकडे जमा केले. त्यामध्ये अशा घरातील आकडेवारीचा अभ्यास केला, ज्यामध्ये कुटुंबात फक्त एक कोरोना रुग्ण होता आणि कुटुंबातील इतर सदस्य त्याच्या सोबतच राहत होते. 392 घरातील संक्रमण आणि 105 इंडेक्स रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. इंडेक्स रुग्ण म्हणजे कुटुंबातील एकटा रुग्ण. अभ्यासात दिसून आलं की, कुटुंबातील व्हायरस संक्रमणाचा दर 16.03 टक्के होता. हा दर सार्स, मर्स आणि 2009 च्या इन्फ्लूएंझा एच्या तुलनेत  जास्त आहे. यामुळे संक्रमित लोकांची संख्या जास्त असू शकते. शिवाय संक्रमणाचा धोका संपर्कात येणाऱ्या व्यक्तीचं वय, संक्रमिक व्यक्तीसह नातं इत्यादीवर अवलंबून आहे. कुटुंबात संसर्ग होण्याची शक्यता जास्त कम्युनिटीच्या तुलनेत घरात संक्रमण होण्याची शक्यता जास्त आहे आणि त्यामुळे अशी प्रकरणं जास्त असतील, असं संशोधकांनी म्हटलं आहे. वयस्कर व्यक्तींमध्ये जास्त प्रमाण हा दर मुलांच्या तुलनेत वयस्कर व्यक्तींमध्ये जास्त दिसून आला आहे. म्हणजे एकाच स्रोताच्या संपर्कात आल्याने वयस्कर व्यक्तींना संक्रमण होण्याची शक्यता 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांपेक्षा जास्त असावी. या व्हायरसची लागण कोणत्याही वयात होऊ शकते,असं अनेक संशोधनात दिसून आलं आहे, वयस्कर आणि लहान मुलांमध्ये दुसऱ्या क्रमाच्या व्हायरसचा दराचं कारण वेगवेगळी असू शकतात, याबाबत अधिक अभ्यास करण्याची गरज आहे, असंही संशोधकांनी म्हटलं आहे. यामध्ये घरातील सदस्यांचा संक्रमित व्यक्तीसह व्यवहार, त्यांचं कामकाज अशी कारणंही या दरावर प्रभाव टाकू शकतात. पती किंवा पत्नीला संक्रमणाचा धोका जास्त रुग्णाचा पती किंवा पत्नीला घरातील इतर सदस्यांच्या तुलनेत संक्रमण होण्याचा धोका जास्त असतो. कारण ते एमकेकांच्या संपर्कात येण्याची शक्यता जास्त असते. विशेषत: जर ते एकाच रूममध्ये राहत असतील. क्वारंटाइनमुळे कमी होऊ शकतो धोका संशोधकांनी दिसून आलं की, 105 रुग्णांना कोरोनाव्हायरसचं निदान झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला घरात 14 दिवसांसाठी क्वारंटाइन केलं. जर घरातल्या इतर सदस्यांनी मास्क घातलं आणि रुग्णापासून दूर राहिले तर त्यांना संक्रमण झालेलं नाही. याचा अर्थ स्वत:ला घरात क्वारंटाइन करणं हे सार्स कोव 2 चं संक्रमण रोखण्यासाठी प्रभावी आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या