Home /News /coronavirus-latest-news /

Corona ला हरवण्यासाठी हर्ड इम्युनिटी कुचकामी; दुसऱ्यांदा Covid झालेल्या शास्त्रज्ञांकडून धक्का

Corona ला हरवण्यासाठी हर्ड इम्युनिटी कुचकामी; दुसऱ्यांदा Covid झालेल्या शास्त्रज्ञांकडून धक्का

मोठ्या समूहाला corona विषाणूचा संसर्ग झाला की प्रतिकारशक्ती आपोआप वाढते. त्यालाच हर्ड इम्युनिटी म्हणतात. Herd Immunity आली की, आपण Covid संकटावर मात करू शकू, असं इतके दिवस मानलं जात होतं. पण...

    नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : Coronavirus  ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.  त्याच वेळी मृत्युदर कमी होतो आहे. त्यामुळे समूह संसर्गातून येणारी प्रतिकारशक्ती वाढते आहे. यालाच हर्ड इम्युनिटी म्हणतात आणि अशी प्रतिकारशक्ती निर्माण झाली की आपण कोरोनावर मात करू शकू, असं इतके दिवस मानलं जात होतं. पण Covid-19 वर अभ्यास करणाऱ्या एका वैज्ञानिकाला दुसऱ्यांदा कोरोना विषाणूचा संसर्ग झाला तेव्हा आधी निर्माण झालेली प्रतिकारशक्ती कुचकामी ठरल्याचं त्यानं दाखवून दिलं. 69 वर्षांचे डॉक्टर अलेक्झांडर शिपार्नो म्हणाले की,  त्यांनी covid-19 पासून बनलेल्या अँटीबॉडीजची त्यांच्या शरीरात राहण्याची वेळ यांचं मूल्यमापन केलं. यावरून त्यांना असं आढळलं की अँटीबॉडीजची शरीरात वेगाने घट झाली आहे. कोरोनाने दुसऱ्यांदा संक्रमित झाल्यावर या शास्त्रज्ञाला कळलं की आजारानंतर 3 महिन्यानंतर अँटीबॉडी शोधणं अशक्य आहे. ते म्हणाले की पहिल्यांदा आजारी पडल्यानंतर अवघ्या सहा महिन्यानंतर कोविड 19 पासून संरक्षण करणाऱ्या अँटीबॉडीज संपुष्टात आल्या. म्हणूनच दुसऱ्यांदा संसर्ग झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. हर्ड इम्युनिटीची अपेक्षा निरुपयोगी ठरली फ्रान्सच्या प्रवासात फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदा त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली. कोरोनातून पहिल्यांदा बरं झाल्यानंतर  त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ क्लिनिकल अँड एक्सप्रिमेंटल मेडिसिनमध्ये कोरोना विषाणूचा अभ्यास सुरू केला. यावेळी त्यांना घशामध्ये खवखव जाणवली. त्यांचा दुसरा संसर्ग हा पूर्वीपेक्षा जास्त तीव्र होता‌. ते म्हणाले की माझ्या शरीराचे तापमान पाच दिवस 39 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त होतं आणि माझी वास घेण्याची क्षमता नाहीशी झाली होती, यासोबतच त्यांच्या तोंडाची चवसुद्धा गेली होती. आजाराच्या सहाव्या दिवशी त्यांनी फुफ्फुसांचं सिटीस्कॅन केलं होतं ते स्वच्छ होतं आणि सिटीस्कॅनच्या तिसऱ्या दिवशी त्यांना एक्स-रे काढल्यावर लक्षात आलं की त्यांना डबल न्यूमोनिया झाला होता. त्यानंतर व्हायरस निघून गेला आणि दोन आठवड्यांनंतरही कोणत्याच सॅम्पलमध्ये हा व्हायरस सापडला नाही. या अभ्यासावरून डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला की हर्ड इम्युनिटी या साथीला हरवेल अशी आशा ठेवणं निरर्थक आहे. हर्ड इम्युनिटीसाठी दिला गेला इशारा शिपार्नो म्हणाले की,आम्हाला एका अशा लसीची आवश्यकता आहे जी बऱ्याच वेळा वापरली जाऊ शकते. ॲडेनोव्हायरल वेक्टरवर आधारित लस पुन्हा देता येणार नाही कारण ॲडेनोव्हायरल इंजेक्शन वारंवार वापरले जाऊ शकत नाही. डॉक्टरांनी स्वत:च्या अनुभवावरून काढलेला निष्कर्षातून असं दिसून आलं की हर्ड इम्युनिटी मिळवणं कठीण आहे कारण अनेक दिवस हा व्हायरस राहणार आहे. शिपार्नो  यांनी हर्ड इम्युनिटीवर अवलंबून लोकांना इशारा देताना सांगितले आहे की covid-19 ला नष्ट करण्यासाठी अनेक लसींची गरज भासणार आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या