मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

अमेरिकेनंतर कोरोनाचा जगातला नवा हॉटस्पॉट भारत नव्हे! या देशात एका दिवसात सापडले अर्धा लक्ष रुग्ण

अमेरिकेनंतर कोरोनाचा जगातला नवा हॉटस्पॉट भारत नव्हे! या देशात एका दिवसात सापडले अर्धा लक्ष रुग्ण

कोरोनाच्या नकाशावर भारत आणखी ठळक होतोय आणि रशियाला मागे टाकत तो दुसऱ्या क्रमांकावर जाईल असा धोका वाढला होता. पण धक्कादायक आकडेवारी भलत्याच देशाकडे इशारा करते आहे.

नवी दिल्ली, 22 जून : Covid-19 ची भयानक साथ जगभरात (Global coronavirus) नव्या वळणावर आली आहे. जगभरात 90 लाख लोकांना या विषाणूची (Coronavirus ) लागण झाली आहे. चीनसारख्या देशाने त्यावर विजय मिळवल्याचं सांगत नवीन रुग्ण नाहीत असं दाखवून दिलं होतं, तिथे कोरोना साथीची दुसरी लाट आली आहे. तर दुसरीकडे अमेरिका (USA), रशियानंतर (Russia) आता भारत जागतिक कोरोना हॉटस्पॉटच्या नकाशात वरच्या स्थानी जात आहे. पण त्याबरोबर लॅटिन अमेरिकेत अचानकपणे या साथीने झपकन डोकं वर काढलं आहे. ब्राझीलमध्ये एका दिवसात 54,000 कोरोनारुग्ण सापडले. कुठल्याही देशात आतापर्यंत एका दिवसात एवढे रुग्ण सापडलेले नव्हते. शुक्रवार ब्राझील या लॅटिन अमेरिकन देशासाठी काळा दिवस ठरला. एका दिवसात अर्धा लाख रुग्ण सापडले आणि त्यांचा कोरोनाबळींचा आकडाही मोठा आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 50,000 जणांचा या साथीत मृत्यू झाला आहे. रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणावर चाचण्या अजूनही होत नाहीत. देशाला अद्याप पूर्ण वेळ आरोग्य मंत्रीही नाही. त्यामुळे पुढच्या काही दिवसात याच देशात कोरोनाव्हायरच्या साथीचा विस्फोट होण्याचा धोका आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 लाख 20 हजार लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. या देशात कोरोनारुग्णांच्या संख्येत गेले महिनाभर घट झालेली दिसली. पुन्हा एकदा साथीने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. कारण दररोजची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. त्यातच या देशातल्या अनेक राज्यांमध्ये मास्क वापरणं बंधनकारक नाही. त्यामुळे धोका वाढतो आहे. आमदाराच्या घरी Corona चा कहर; एकामागे एक 18 कुटुंबीय निघाले COVID पॉझिटिव्ह जगभरात सगळीकडेच लॉकडाऊननंतर आता उद्योगधंदे आणि जनजीवन परत मार्गावर यायला लागलं आहे. पण अनलॉक सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी कोरोनाव्हायरसच्या साथीची नवी लाट आलेली दिसते. ही लाट आणखी धोकादायक आणि जीवघेणी असू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. संकलन, संपादन - अरुंधती अन्य बातम्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी पाकिस्तानी संघाची झाली कोरोना चाचणी; धक्कादायक बाब आली समोर कोरोनाच्या रुग्णांना या हॉस्पिटलमध्ये दिली जाते Tik Tok थेरपी, डॉक्टरच देतात हे फक्त इनरवेअर घालून कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या नर्सला पुन्हा मिळाली नोकरी!
First published:

Tags: Brazil, Coronavirus

पुढील बातम्या