मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

वाफ घेण्याने Covid-19 पासून बचाव होतो? Reuters चं Fact check काय सांगतं पाहा

वाफ घेण्याने Covid-19 पासून बचाव होतो? Reuters चं Fact check काय सांगतं पाहा

खोकला बरा करायचा असेल तर, नारळाच्या तेलात नीलगिरीच्या तेलाचे काही थेंब मिसळा आणि छातीवर मॉलिश करा. गरम पाण्यात नीलगिरीच्या तेलाचे थेंब घालून वाफही घेता येते. यामुळे श्वासोच्छ्वास घेण्याच त्रास होणार नाही.

खोकला बरा करायचा असेल तर, नारळाच्या तेलात नीलगिरीच्या तेलाचे काही थेंब मिसळा आणि छातीवर मॉलिश करा. गरम पाण्यात नीलगिरीच्या तेलाचे थेंब घालून वाफही घेता येते. यामुळे श्वासोच्छ्वास घेण्याच त्रास होणार नाही.

रॉयटर्स (Reuters Fact Check) या परदेशी वृत्तसंस्थेने वाफ घेण्याने कोरोना रुग्णांना फायदा होतो की नाही याचा तपास घेतला. काय सांगतो त्यांचा तपास?

नवी दिल्ली, 1 मे: सध्या सोशल मीडियाच्या सहजपणामुळे आणि वेगामुळे काही बातम्यांच्या मागची सत्यता न पडताळताच त्या दिल्या जातात आणि ते भर्रकन व्हायरल होतात. मग ती अफवा आहे की सत्य बातमी याचा शोध घ्यावा लागतो. त्यामुळे सगळ्या मीडिया हाउसेसनी फॅक्ट चेक किंवा पडताळणी करणाऱ्या बातम्या द्यायला सुरुवात केली आहे. भारतात Coronavirus च्या दुसऱ्या लाटेच्या वेळी वाफ घ्यायचा सल्ला बहुतेक सगळ्या डॉक्टरांनी दिला आहे. काही रुग्णालयांमधूनसुद्धा उपचाराचा भाग  म्हणून दिवसातून एकदा कोविड रुग्णांना वाफ दिली पाहिजे. रॉयटर्स (Reuters Fact Check) या परदेशी वृत्तसंस्थेने वाफ घेण्याने कोरोना रुग्णांना फायदा होतो की नाही याचा तपास घेतला. आता त्यांच्या फॅक्ट चेकनुसार असा कुठलाही दाखला सिद्ध झालेला नाही. Facebook वर आणि इतरही सोशल मीडियावर गेल्या वर्षी आणि या वर्षीही Coronavirus वर घरगुती उपाय म्हणून व्हायरल होत असलेली गोष्ट म्हणजे पाण्याची किंवा काही औषधी वनस्पतींच्या पानांची पाण्यात घालून वाफ घ्यावी. असं केलं तर कोविड-19 आजाराला रोखणं शक्य आहे,असा दावा केला जातो. या दाव्याचं रॉयटर्स या वृत्तसंस्थेनी फॅक्ट चेक केलं आहे. रॉयटर्सच्या वेबसाइटवर यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध झालं आहे. अशी परिस्थिती देशात फक्त एकट्या मुंबईत; BMC ने जारी केली कोरोनाची आकडेवारी एक माणूस त्याच्या घरीच तयार केलेल्या सोना बाथ फॅसिलिटीमधून चालत बाहेर येतो आहे असा एक व्हिडिओ गेल्या काही महिन्यांपासून फेसबुकवर 1000 वेळा शेअर केला गेला आहे. या व्हिडिओची कॅप्शन आहे, “Build your sauna/steam challenge !’, म्हणजे तुम्हीच तुमच्या घरी सोना तयार करा आणि स्टीम चॅलेंज अनुभवा.’ त्यात पुढे लिहिलंय,‘निलगिरी झाडाची, पेरूची पानं आणि महलोनाइन टी गरम पाण्यात उकळून वाफ घ्या आणि व्हायरस पळवून लावा : तुमचं आरोग्य तुमच्या हाती! ’ दुसऱ्या एका पोस्टमध्ये दावा केलाय की, ‘नाकाने आणि तोंडाने पाण्याची वाफ घेतली तर कोविड-19 चा विषाणू मारून टाकता येतो. आणि जर सगळ्यांनी आठवडाभर वाफ घेण्याचं अभियान राबवलं तर ही महामारीच संपून जाईल.’ अशा प्रकारचे मोफतचे सोशल मीडियावरचे सल्ले आणि अर्धवट ज्ञान याला सर्वांत पहिल्यांदा रॉयटर्सने मार्च 2020 मध्येच आव्हान दिलं होतं. आव्हान दिलं म्हणजे त्यातील सत्यासत्यता पडताळून सत्य वाचकांपर्यंत आणण्यासाठी रॉयटर्सने तज्ज्ञांची मतं घेतली. खरं तर अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शन (CDC) किंवा जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्यापैकी कुणीही वाफ घेतल्याने कोविड-19 आजार बरा होतो किंवा त्याच्या उपचारांमध्ये वाफ घेण्याचा समावेश करावा असा काहीही सल्ला दिलेला नाही. RT-PCR टेस्टमधील CT Value म्हणजे काय? कोरोना रिपोर्टवर याचा काय परिणाम होतो? आधुनिक वैद्यकशास्रानुसारही श्वासनलिकेतील वरच्या भागात झालेल्या जंतू संसर्गामध्ये घरगुती उपाय म्हणून वाफ घेण्याचा सल्ला दिला जातो. पण याची परिणामकारता फार कमी प्रमाणात असून उलट वाफ घेताना शरीराला भाजणं किंवा वाफेमुळे श्वासोच्छवासाच्या मार्गात जखमदेखील होऊ शकते असं या शास्त्रज्ञांचं मत आहे. स्पेनमधल्या पीडिअट्रिक असोसिएशनने केलेल्या अभ्यासातून सर्वांना एक खबरदारी घ्यायला सांगितली आहे. त्यांनी म्हटलंय, ‘एखाद्या पातेल्यात पाणी गरम करून त्यावर चेहरा धरून डोक्यावरून टॉवेल घेण्याचा प्रकार वाफ घेण्यासाठी घरोघरी केला जातो. यात त्या वाफेमुळे नाही तर त्या उकळलेल्या पाण्यामुळे तसं करणाऱ्याला अधिक धोका आहे. एकतर ते पाणी अंगावर सांडून भाजू शकतं किंवा गरम भांड्याचा चटका बसू शकतो.’ बर्मिंगहॅम चिल्ड्रन्स हॉस्पिटल यांनी पुन्हा एकदा वाफ घेण्यासंबंधीच्या धोक्याबाबत खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. या हॉस्पिटलनी फेसबुक,‘आमची स्पेशलिस्ट बर्न्स टीम सर्व कुटुंबीयांना पुन्हा एकदा इशारा देत आहे की वाफ घेतल्यामुळे कोविड-19 बरा होतो हा दावा मिथ्या आहे. दुर्दैवाने वाफारा घेतल्यामुळे किंवा तो घेताना गरम पाण्याचा चटका बसलेले अनेक तरुण आमच्याकडे येत आहेत. अनेकदा या जखमा इतक्या गंभीर आहेत की त्यामुळे एखाद्याचं आयुष्यच बदलून जाऊ शकतं. त्यामुळे अजिबात रिस्क घेऊ नका.’ रॉयटर्सने त्यांच्या फॅक्ट चेकमध्ये वाफ घेतल्याचा फायदा होतो, याचा पुरावा नाही त्यामुळे हे खोटं असल्याचं मांडलं आहे. आपल्याकडे भारतात मात्र अनेक लोक आजही वाफ घेतली जाते. रॉयटर्स ही मूळची ब्रिटीश वृत्तसंस्था आहे.
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या