Home /News /coronavirus-latest-news /

काळी मिरी-मधाने 100% बरा होतो कोरोना; व्हायरल मेसेजचं FACT CHECK

काळी मिरी-मधाने 100% बरा होतो कोरोना; व्हायरल मेसेजचं FACT CHECK

एका भारतीय विद्यार्थ्याने कोरोनावर घरगुती उपचार शोधल्याचा दावा केला आहे. 

    नवी दिल्ली, 15 जुलै : भारतासह जगभरातील इतर देशातील शास्त्रज्ञ कोरोनाविरोधात लस तयार करण्यात जुटलेत. कोणती औषधं कोरोनावर प्रभावी ठरतात हे तपासलं जातं आहे. तरी अद्याप कोरोनाविरोधात प्रभावी असा उपचार मिळालेला नाही. अशात आता कोरोनाविरोधात घरगुती उपचार मिळाल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात घरगुती उपायांनीच कोरोना 100% बरा होतो असा दावा केला आहे. व्हायरल होणाऱ्या या पोस्टनुसार पद्दुचेरीच्या एका विद्यार्थ्याने कोरोनावर उपचार शोधल्याचं सांगितलं जातं आहे. ज्यामध्ये मध, आलं आणि काळी मिरीने कोरोना 100% बरा होतो असा दावा करण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर जागतिक आरोग्य संघटनेनंदेखील या उपचाराला मान्यता दिली आहे, असं या पोस्टमध्ये सांगितलं जातं आहे. पोस्टमध्ये म्हचलं आहे. अखेर पद्दुचेरी युनिव्हर्सिटीतील रामू नावाच्या भारतीय विद्यार्थ्याने कोविड-19 वर घरगुती उपचार शोधून काढलाच. याला जागतिक आरोग्य संघटनेनंही स्वीकार केलं आहे. एक मोठा चमचा काळी मिरी पावडर, 2 टेबलस्पून मध आणि थोडा आल्याचा रस एकत्र करून सलग 5 दिवस घेतल्यास कोरोनाचा प्रभाव कमी होतो हे रामूने सिद्ध केलं आहे. संपूर्ण जगाने आता हे स्वीकारलं आहे. 2020 मध्ये अखेर चांगली बातमी आली. कृपया आपल्या मित्रांनादेखील ही माहिती शेअर करा. हे वाचा - कोरोनाशी लढण्यासाठी मदत करतं Vitamin D; संशोधकांचा दावा या पोस्टमध्ये जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील हा उपचार स्वीकारल्याचं सांगितलं जातं आहे. या WHO च्या वेबसाइटवर मध आणि काळी मिरीच्या उपचाराबाबत कोणतंही अपडेट नाही. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाइटवर MYTH ‌BUSTERS सेक्शन आहे. जिथं  सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या उपचारांमध्ये किती तथ्य आहे आणि नाही ते सांगितलं जातं, अफवांचं खंडन केलं जातं. याच सेक्शनमध्ये काळी मिरीमुळे कोरोना बरा होऊ शकत नाही, असंही सांगण्यात आलं आहे. गुगलवरदेखील सर्च करून अशी काही बातमी नाही, ज्यामध्ये पद्दुचेरी युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्याने औषध शोधल्याचा उल्लेख आहे. मध, काळी मिरी, आलं गुणकारी आहेत, त्याचा आरोग्याला फायदा होतो, आयुष मंत्रालायानेदेखील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे पदार्थ सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र यामुळे कोरोना बरा होऊ शकतो, असे काही पुरावे नाहीत. आयुष मंत्रालयाने आयुर्वेदिक पद्धतीने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दिलेल्या टीप्स दिवसभर जास्तीत जास्त गरम पाणी प्या. दिवसभरात कमीत कमी 9 ते 10 ग्लास पाणी जरूर प्या. दररोज कमीत कमी 30 मिनिटं योगा करा. आहारात जिरं, हळद, लसूण, कोथिंबीर यांचा समावेश करा. च्यवनप्राशचं सेवन जरूर करा. दररोज एक चमचा च्यवनप्राश खा. मधुमेही रुग्णदेखील च्यवनप्राश खाऊ शकतात. तुळस, दालचिनी, काळी मिरी, आलं आणि मनुका पाण्यात टाकून उकळून काढा तयार करा आणि हा काढा दररोज प्या. रात्री झोपण्यापूर्वी हळद घालून दूध प्या. हे वाचा - कोरोनाच्या आणखी एका लक्षणाचा लागला शोध, तुम्हीही घ्या काळजी! त्यामुळे काळी मिरी आणि मध कोरोनावर उपचार आहे, याने कोरोना बरा होतो ही फक्त अफवा आहे हे सिद्ध झालं. कोरोनाच्या संकटात असे बरेच मेसेज व्हायरल होत आहेत. त्यांची पडताळणी न करता अंमलबजावणी करणं महागात पडू शकतं. कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी सरकारने जारी केलेल्या गाइडलान्सनुसार आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि अशा फेक मेसेजवर विश्वास ठेवू नका, शिवाय ते फॉरवर्डही करू नका.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या