कोरोना रिटर्न! फ्रान्सनंतर इंग्लंडमध्ये पुन्हा 4 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन, भारताच्या उलट आहेत अटी

कोरोना रिटर्न! फ्रान्सनंतर इंग्लंडमध्ये पुन्हा 4 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन, भारताच्या उलट आहेत अटी

युरोपमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. नियंत्रणात आलेल्या कोरोनाच्या संसर्गानं अचानक वेग घेतल्यानं मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

लंडन, 01 ऑक्टोबर : युरोपमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. नियंत्रणात आलेल्या कोरोनाच्या संसर्गानं अचानक वेग घेतल्यानं मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना रिटर्न आल्यामुळे दुसऱ्यांदा फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात येत आहे. युरोपमध्ये कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्यानं बऱ्याच देशांनी आता पुन्हा लॉकडाऊन करायला सुरुवात केली आहे. या लॉकडाऊनमध्ये भारताच्या बरोबर उलट या लॉकडाऊनच्या नियमावली आहेत. भारतात ज्या गोष्टी सुविधा बंद आहेत त्या युरोपीय देशांमध्ये सुरू आहेत.

फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी कोरोनाचा धोका पाहता देशात दुसऱ्यांदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. 5 नोव्हेंबरपासून लॉकडाऊनचा कालावधी सुरू होणार आहे. 2 नोव्हेंबरला हा लॉकडाऊन संपणार आहे.

युरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट, मोठ्या प्रमाणात वाढतायत रुग्ण

युरोपीय देशांमध्ये कोरोनानं पुन्हा कमबॅक केलं असून मोठ्या प्रमाणात लोकांना संसर्ग होत आहे. याआधी फ्रान्समध्ये 4 आठड्यांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. फ्रान्समध्ये रात्री कर्फ्यू तर दिवसा अत्यावश्यक सेवा आणि शाळा वगळता सर्व बंद ठेवण्यात येणार आहे. तर इंग्लंडमध्ये आरोग्य सेवा, मेडिकल सर्व्हिस, व्यायामासाठी बाहेर पडणं आणि अभ्यास, शाळा इत्यादी सेवा सुरू राहणार आहेत. शक्य असेल त्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर मोठे व्यवसाय, दुकानं, रेस्टॉरंट आणि पब बंद ठेवण्यात येणार आहेत.

हे वाचा-कसं शक्य आहे? संपूर्ण देशात 6 महिन्यांपासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही.

हे वाचा-दुसरी लाट! COVID-19 रुग्णांच्या संख्येत या राज्याने महाराष्ट्रालाही टाकलं मागे

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी ट्वीट करून नागरिकांना घरी राहण्याचं आणि सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे. याशिवाय नागरिकांनी अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर पडू नये असंही त्यांनी सांगितलं आहे. शाळा आणि अत्यावश्यक दुकाने खुली राहतील. तर अत्यावश्यकता नसेल तर प्रवास टाळण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. भारतात शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आले आहेत. तर युरोपीय देशांमध्ये बरोबर उलट शाळा, आवश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Published by: Manoj Khandekar
First published: November 1, 2020, 8:24 AM IST

ताज्या बातम्या