• Home
  • »
  • News
  • »
  • coronavirus-latest-news
  • »
  • कोरोनाचा भारतीयांना असाही फटका! 2 वर्षांनी घटलं आयुर्मान, IIPS अभ्यासात आलं समोर

कोरोनाचा भारतीयांना असाही फटका! 2 वर्षांनी घटलं आयुर्मान, IIPS अभ्यासात आलं समोर

कोरोनामुळे देशातल्या नागरिकांचं आयुर्मान (Life Expectancy) सुमारे 2 वर्षांनी कमी झाल्याची धक्कादायक माहिती या संशोधनातून पुढे आल्याचं संशोधकांनी सांगितलं आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर: गेल्या दीड ते दोन वर्षांपासून देशातल्या बहुतांश राज्यांमध्ये कोरोनाचा (Corona) कहर होता. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ( Second Wave) ओसरल्याची चिन्हं दिसत आहेत. त्यामुळे सरकारनं निर्बंध शिथिल केले आहेत. परंतु, याचदरम्यान एका संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोरोनामुळे देशातल्या नागरिकांचं आयुर्मान (Life Expectancy) सुमारे 2 वर्षांनी कमी झाल्याची धक्कादायक माहिती या संशोधनातून पुढे आल्याचं संशोधकांनी सांगितलं आहे. देशातल्या प्रत्येक घटकावर कोरोनाचा दुष्परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचा मानवी जीवनावर कसा परिणाम झाला आहे, याविषयीचं संशोधन विविध स्तरावर सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतल्या 'इंटरनॅशनल इन्स्टिट्युट फॉर पॉप्युलेशन स्टडीज'च्या (IIPS) वैज्ञानिकांनी कोरोनाचा मानवी आयुर्मानावर परिणाम या अनुषंगानं संशोधन (Research) केलं आहे. देशातल्या नागरिकांचं आयुर्मान कोरोनामुळं दोन वर्षांनी कमी झाल्याचं त्यातून स्पष्ट झालं आहे. 'आयआयपीएस'चे असिस्टंट प्रोफेसर सूर्यकांत यादव यांनी सांगितलं की, '2019 मध्ये पुरुष आणि महिलांचं आयुर्मान अनुक्रमे 69.5 आणि 72 वर्ष होतं; मात्र 2020 मध्ये हे आयुर्मान अनुक्रमे 67.5 आणि 69.8 वर्ष झालं आहे.' वाचा-EXCLUSIVE: लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लशीबाबत अदार पुनावालांचं मोठं वक्तव्य देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या दराचा पॅटर्न अभ्यासण्यासाठी 'आयआयपीएस'नं हे संशोधन केलं आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी कोरोनामुळे जगभरात सर्वाधिक मृत्यू (Coronavirus Death) झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2020 पासून आतापर्यंत कोरोनामुळे 4.5 लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे; मात्र प्रत्यक्षात हा आकडा 4.5 लाखांपेक्षा अधिक असल्याचं डेटा तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अमेरिका, इंग्लंड आणि वेल्समध्ये आयुर्मानात एक वर्षापेक्षा अधिक घट झाली आहे. याबाबत यादव यांनी सांगितलं, 'आयुर्मानाचा कालावधी वाढवण्यासाठी मागील दशकामध्ये जे काही प्रयत्न झाले, हे सर्व प्रयत्न कोरोनामुळे धुळीस मिळाले आहेत. देशात सध्या असलेलं सरासरी आयुर्मान आता 2010 प्रमाणेच आहे. ही आकडेवारी पूर्वपदावर येण्यासाठी आता खूप वर्षं लागणार आहेत.' वाचा-जगातील सर्वात मोठ्या लसीकरणासाठी फायदेशीर ठरलं Co-WIN App; काय आहे खासियत प्रत्येक व्यक्तीच्या सरासरी आयुर्मानाचा अंदाज व्यक्त केला जातो. नवीन अभ्यासानुसार, आयुर्मानातल्या असमानतेकडे (लोकसंख्येमध्ये आयुर्मानातला फरक) लक्ष दिलं गेलं. 35 ते 69 वयोगटातल्या पुरुषांवर कोरोनाचा सर्वाधिक परिणाम दिसून आल्याचं यात आढळलं. 2020 मध्ये कोविड-19 (Covid-19) संसर्गामुळे 35 ते 79 वयोगटातल्या नागरिकांच्या मृत्यूचं प्रमाण सामान्य वर्षांच्या तुलनेत अधिक होतं. त्यातही 35 ते 69 वयोगटातल्या व्यक्तींचं प्रमाण अधिक होतं, असं अभ्यासात म्हटलं आहे. 'आयआयपीएस'च्या वैज्ञानिकांनी मानवी आयुर्मानाच्या अभ्यासाकरिता '145 नेशन ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी' (GBD), तसंच 'कोविड इंडिया अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस पोर्टल'वरच्या (API) डेटाचा एकत्रित वापर केला आहे. मृत्युदरावरच्या परिणामाचा प्रश्न बघता भारतात मानवी आयुर्मानात दोन वर्षांची घट दिसून येत आहे. ही स्थिती पाहता भारत सध्या मध्यभागी आहे, असं या संशोधनातून दिसून आलं आहे.
First published: